आश्‍वासनपूर्ती न केल्याने ‘अन्नदाता’चे आंदोलन

आश्‍वासनपूर्ती न केल्याने ‘अन्नदाता’चे आंदोलन
आश्‍वासनपूर्ती न केल्याने ‘अन्नदाता’चे आंदोलन

औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती न करणाऱ्या शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत अन्नदाता शेतकरी संघटनेने रविवारी (ता. ३) फसवणूक दिवस पाळला. यानिमित्त केंद्र व राज्य शासनाविरोधात येथील क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  शेतकऱ्यांसह अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात या आंदोलनात सहभाग घेतला. गतवर्षी १ जूनला पुकारलेल्या शेतकरी संपानंतर राज्य शासनाने संपाची हाक देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीसोबत चर्चा केली. कोअर कमिटीला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता एक वर्ष लोटूनही शासनाने केली नाही, अशी टीका श्री. सूर्यवंशी यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याने ३ जून हा फसवणूक दिवस म्हणून साजरा करत असल्याचे सांगत शेतकरी व अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  आपल्या मागण्यांसाठी पुन्हा शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपाचे हत्यार उपसले आहे. शासनाने त्याची दखल न घेतल्यास राज्यात मोठा उद्रेक होण्याची शक्‍यताही सूर्यवंशी यांनी व्यक्‍त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com