agriculture news in marathi, Announce the drought in six talukas | Agrowon

सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

नाशिक : राज्य सरकारची महसूल यंत्रणा विश्वासार्ह असूनही सरकारकडून त्यावर विश्वास का ठेवला जात नाही. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असताना फक्त तीन तालुक्यांमध्येच पीककापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

नाशिक : राज्य सरकारची महसूल यंत्रणा विश्वासार्ह असूनही सरकारकडून त्यावर विश्वास का ठेवला जात नाही. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असताना फक्त तीन तालुक्यांमध्येच पीककापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

पत्रानुसार, जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, ऐन पावसाळ्यात २३८ गावे व वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची समस्या आहे. तीव्र पाणीटंचाई असूनही दुष्काळ जाहीर करण्यासाठी विलंब केला जात आहे.‘केंद्राच्या नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग’ या संस्थेकडून पीक पाण्याच्या स्थितीबाबत राज्य शासनाला अहवाल आल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया केली जाणार अाहे. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे राज्यातील महसूल यंत्रणेवर अविश्वास आहे.

दुष्काळ असताना बँका व पतसंस्थांकडून कर्जवसुलीसाठी नोटीस दिल्या जात आहेत. त्यामुळे आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. विजेची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. अघोषित वीज भारनियमनामुळे राज्यातील नागरिक हैराण झालेले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकीत वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये, यासाठी राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू करण्याची आवश्यकता आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

दुष्काळी स्थिती भयावह
चांदवड व येवला तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, पीक पाहणी अहवालानुसार अत्यंत गंभीर स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती आहे. महसूल यंत्रणेने जिल्हा प्रशासनास तसा अहवालही पाठविलेला आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ नांदगाव, मालेगाव व सिन्नर या तीन तालुक्यांमध्येच पीककापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश दिल्याने त्यावरही भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीरअकोला : पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात कडधान्यांच्या आवकेत घटजळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी...
खानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीरजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प...
पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर...यवतमाळ : जिल्ह्यात सरासरी समाधानकारक पाऊस झाला....
शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या...वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
नखातवाडी तलावातील पाणीसाठा जोत्याखालीपरभणी ः वाढते तापमान, जोराचे वारे, उपसा यामुळे...
रासायनिक खते, कीटकनाशके वापराविषयी...परभणी ः रासायनिक खते, कीटकनाशकांच्या असंतुलित...
सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी :...जाफराबाद, जि. जालना  : तालुक्‍यातील पीक...
पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमकयेवला, जि. नाशिक : येवला तालुका सतत दुष्काळी...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनऔरंगाबाद : कृषी विज्ञान मंडळाच्या...
सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी संकटातसांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...