शिराळ पश्‍चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करा

शिराळ पश्‍चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करा
शिराळ पश्‍चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करा

कोकरूड, जि. सांगली ः शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम डोंगरी भागात सलग तीन महिने होत असलेल्या पावसाने व रोगाने खरिपातील पिके कुजू लागली आहेत. पिकावर व जमिनीवर शेवाळ मोठ्या प्रमाणात साचलेला दिसत आहे.

जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील वारणा नदीला दोन वेळा पूर आला होता. अनेक गावांतील नदीकाठावरील ऊस व भातपीक आणि वैरणीची गवताची कुरणे कित्येक दिवस पाण्याखालीच कुजून गेली आहेत. त्यामुळे जनावरांना ओला चारा मिळेनासा झाला आहे. ओल्या दुष्काळामुळे हिरव्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली.

दूध व्यवसाय अनेक कुटुंबांसाठी उपजीविकेचे साधन बनले आहे. जनाउसाचा पाला, मका, गवत, गाजर गवत प्रामुख्याने जनावरांना ओला चारा म्हणून उपयोगात आणला जातो. वारणा नदीकाठी दोन वेळा पुराच्या पाण्यात नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्याने ऊस व भातपिके, ओला चारा कुजून त्याचा वास येत आहे.

शिराळा पश्‍चिम भागात गेले अडीच महिने सुरू असलेल्या पावसाने खरिपातील पिके कुजू लागली आहेत. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करताना कोणत्याही निकषात अडकवू नये. - विकासराव देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com