अकोट, पातूर तालुक्यांत दुष्काळ जाहीर

अकोट, पातूर तालुक्यांत दुष्काळ जाहीर
अकोट, पातूर तालुक्यांत दुष्काळ जाहीर

अकोला : कमी पावसामुळे या हंगामात अकोट, पातूर तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती तयार झाली होती. मात्र शासनाने या आधी जाहीर केलेल्या दुष्काळी गावांमध्ये या तालुक्यातील गावांचा समावेश नव्हता. परिणामी, नागरिकांमधून रोष व्यक्त होऊ लागला होता. याची दखल घेऊन शासनाने अखेर या दोन्ही तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. यामुळे दोन्ही तालुक्यांतील गावांना दुष्काळी उपाययोजना, सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाने २३ आॅक्टोबर २०१८ च्या शासन आदेशानुसार राज्यात १५१ तालुके आणि २६८ मंडळात दुष्काळ जाहीर केला. यामध्ये तेव्हा अकोला, बाळापूर, बार्शीर्टाकळी, तेल्हारा, मूतिर्र्जापूर या पाच तालुक्यांतील गावांचा समावेश होता. त्या वेळी अकोट, पातूर तालुके वगळण्यात आले. अकोटमधील केवळ आसेगाव बाजार महसूल मंडळ दुष्काळाच्या कक्षेत होता. आता शासनाने पुन्हा एकदा गुरुवारी (ता. २१) नव्याने दुष्काळी भागाची घोषणा केली.

यात अकोट, पातूर तालुक्यांतील २६१ गावांचा समावेश करण्यात आला. तत्काळ या गावांमध्ये दुष्काळी निकष लागू करण्यात आले. दुष्काळी गावांमध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कजार्चे पुनगर्ठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपाच्या चालू बिलात सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, एसटी प्रवासात सवलत, टँकरने पाणीपुरवठा, शेती पंपांची जोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना लागू केल्या आहेत. 

दुष्काळ लागू करण्याबाबत या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांनी, विविध पक्षांच्या नेत्यांनी शासनाकडे मागण्या केल्या होत्या. आंदोलनेसुद्धा झाली. त्याची दखल घेऊन अकोट, पातूर तालुक्यांतील वगळलेल्या गावांचा समावेश झाल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com