agriculture news in Marathi, announcement of 20 lac and gave 14 lac for agri exhibition, Maharashtra | Agrowon

कृषी महोत्सवांसाठी घोषणा २० लाखांची, मिळताहेत १४ लाख
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

अकोला ः राज्यभर काही जिल्ह्यांत झालेले व काही ठिकाणी होत असलेले कृषी महोत्सव पहिल्याच वर्षात जोरात असले तरी शासनाने जाहीर केलेल्या अार्थिक तरतुदीची संपूर्ण रक्कम मिळत नसल्याची बाब समोर अाली अाहे. 

अकोला ः राज्यभर काही जिल्ह्यांत झालेले व काही ठिकाणी होत असलेले कृषी महोत्सव पहिल्याच वर्षात जोरात असले तरी शासनाने जाहीर केलेल्या अार्थिक तरतुदीची संपूर्ण रक्कम मिळत नसल्याची बाब समोर अाली अाहे. 

शासनाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये असे कृषी महोत्सव घेण्यासाठी प्रत्येकी २० लाख याप्रमाणे सहा कोटी ८० लाख रुपये तरतूद प्रस्तावित केली होती. मात्र, अाता या २० लाखांना ३० टक्क्यांची कात्री लावत १४ लाख रुपयेच जिल्हा यंत्रणांच्या हातात टेकवले जात अाहेत. एकीकडे कृषी महोत्सव भव्यदिव्य करण्याच्या सूचना अाणि दुसरीकडे निधीला कात्री, यामुळे यंत्रणांची अोढाताण होत अाहे. परिणामी हा खर्च भागवण्यासाठी इतर योजनांचे निधी वळती केले जात असल्याची कुजबूज सुरू अाहे.

कृषीविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, शेतकरी-शास्त्रज्ञ अाणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षम करणे, समूह/ गट संघटीत करून शेतकरी उत्पादक कंपन्याची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा, या उद्देशाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृखंला विकसित करणे, कृषीविषयक परिसंवाद/व्याख्यानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे अशा विविध उद्देशाने शासनाने मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळता ३४ जिल्ह्यांमध्ये सन २०१६-१७ मध्ये कृषी महोत्सव राबवण्याची घोषणा केली.

अाॅक्टोबर ते मार्च या काळात हे महोत्सव घेतले जावेत अशा स्पष्ट सूचना होत्या. काही जिल्ह्यांमध्ये महोत्सव वेळेत झाले मात्र काही ठिकाणी अद्यापही नियोजनच सुरू अाहे. कृषी महोत्सव पाच दिवस घ्यावा लागत अाहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, शासनाने जाहीर केलेल्या २० लाखांत हा महोत्सव पूर्ण करण्यासाठी इव्हेंट कंपन्यांकडून विशेष उत्साह दाखवला जात नव्हता. काही ठिकाणी दोन-तीन वेळा निविदा प्रसिद्धी करावी लागली. तरीही इव्हेंट घेणारी कंपनी उपलब्ध होत नव्हती. अशा परिस्थितीत नियोजित वेळेत कृषी महोत्सव व्हावा, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी कसब पणाला लावून नियोजन केले; परंतु अाता १४ लाख भेटत असल्याने अाणखी चिंता वाढली अाहे. 

या महोत्सवासाठी शासनाने अाधी २० लाखांची तरतूद प्रस्तावित केली होती; परंतु राज्याची अार्थिक परिस्थिती ठिक नसल्याने याही निधीला ३० टक्के कपातीचा निकष लावण्याचे सांगितले जाते. यामुळे सहा लाख रुपये कमी करून १४ लाख रुपयेच जिल्ह्यांना दिले जात अाहे. एवढ्या रकमेत हा महोत्सव साजरा करण्यासाठी यंत्रणांना अोढाताण करावी लागत अाहे. कृषी महोत्सव झालेल्या जिल्ह्यांमध्ये खर्चाची देयके भागवताना नाकीनऊ अालेले अाहेत; परंतु अायोजक यंत्रणांना कुठल्याही तक्रारीची सोय नाही. या कपातीबाबत कुठलाही अधिकारी स्पष्ट बोलायला मात्र धजावत नाही.

इतर अॅग्रो विशेष
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...