एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश सेल्शिअसच्या वर गेलेले असताना, वाढत्या इंधन दराचे चटकेही
ताज्या घडामोडी
अकाेला (प्रतिनिधी) ः कीडनाशकाच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे यवतमाळ जिल्ह्यात बळी गेलेल्यांची संख्या समोर अल्याने संपूर्ण राज्य व देशात खळबळ उडाली. यवतमाळ पाठोपाठ अकोला जिल्हासुद्धा या बळींमध्ये दुसऱ्या स्थानावर अाला असून हंगामात ११ जणांनी अापला जीव गमावला अाहे. मंगळवारी (ता.१२) विषबाधेमुळे उपचार घेत असलेले अकोट येथील अल्प भूधारक शेतकरी गोविंद मणिराम अस्वार (४६) यांचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
यवतमाळ जिल्ह्यात कीडनाशक फवारणीच्या विषबाधेमुळे २१ शेतकऱ्यांचा बळी गेलेला असून बाधितांची संख्या ८०० पेक्षा अधिक अाहे. या पाठोपाठ अकाेला जिल्ह्यातसुद्धा फवारणीमुळे

मृत्यू वाढत चालले अाहेत. हा अाकडा अस्वार यांच्या मृत्यूमुळे ११ पर्यंत पोचला आहे. गाेविंद अस्वार यांनी गेल्या बुधवारी (ता. सहा) शेतात पिकावर कीडनाशकाची फवारणी केली हाेती. त्यानंतर गुरुवारी (ता. सात) त्यांची तब्बेत खालावली.
कुटुंबीयांनी त्यांना प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी भरती केले. परंतु, दुपारी त्यांची तब्बेत जास्त खराब झाल्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. गाेविंद अस्वार यांची प्रकृती चिंताजनक हाेत होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली. मंगळवारी त्यांची प्राणज्याेत मावळली.
अाजवरचे मृतक
नितीन श्रीकृष्ण खंडारे (बार्शीटाकळी), फिराेज खान साहेब खान (रा. बाेर्डी, ता. अकाेट), रामेश्वर श्रीराम वाघ (रा. तेल्हारा), प्रवीण रायबाेले (रा. माटाेडा, ता. मूर्तिजापूर), संदीप सिरसाट (बादलापूर, ता. अकाेला), शेख इमरान शेख लाल (३२, वरड, पारस, बाळापूर), राजेश फुकट (आगर, ता. अकाेला), गणपत चव्हाण (इंदिरा आवास, बार्शीटाकळी), अशाेक दहिभाते (मुंडगाव, ता. अकाेट), मधुकर माराेती गावंडे (गाेरेगाव) व गोविंद मणिराम अस्वार (४६, धाबडगाव वेटाळ, अकाेट).
- 1 of 146
- ››