agriculture news in Marathi, APMC will got national Market status, Maharashtra | Agrowon

बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय बाजाराचा दर्जा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे ः शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाची असणारी बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणारी सुधारणा राज्यपालांच्या सहीने मंजूर झाली आहे. या सुधारणेमुळे आता एकूण आवकेच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येत असलेल्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. 

यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांचा समावेश होणार असून, या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांचे प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. तर या सुधारणेमुळे या बाजार समित्यांना निवडणुकांमधून वगळण्यात येणार आहे. 

पुणे ः शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाची असणारी बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणारी सुधारणा राज्यपालांच्या सहीने मंजूर झाली आहे. या सुधारणेमुळे आता एकूण आवकेच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येत असलेल्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. 

यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांचा समावेश होणार असून, या समित्यांवर आता शासन नियुक्त २३ जणांचे प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. तर या सुधारणेमुळे या बाजार समित्यांना निवडणुकांमधून वगळण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाच्या नवीन मॉडेल  विविध पणन सुधारणा राज्य शासनाने केल्या आहेत. यामधील सर्वांत महत्त्वपूर्ण सुधारणांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या मोठ्या बाजार समित्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून स्वतःच्या ताब्यात घेण्यात भाजप सरकारला यश येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, लातूर या समित्यांचा समावेश होतो. याबाजार समित्या आर्थिक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची सत्ता केंद्रे बनली आहेत. या बाजार समित्यांना कायद्याने राष्ट्रीय दर्जा देत, निवडणुकांमधूनच वगळण्यात आल्या आहेत. यामुळे आता याबाजार समित्यांवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाची नियुक्ती होणार आहे. 

कार्यकारी समितीची होणार निवड
शासन नियुक्त प्रशासकीय मंडळातून राष्ट्रीय बाजार समिती बाजारतळासाठी आपल्या सदस्यांमधून कार्यकारी समितीची नियुक्ती करणार आहे.   

प्रस्तावित सुधारणांची मुख्य वैशिष्ट्ये 

 • पशुधनाच्या संबंधातील पणनाचे विनिमयन करण्याकरीत तरतुदी
 • राष्ट्रीय नामांकित बाजारतळ व त्याच्याशी संबंधित आणि अनुषंगिक बाबींकरत तरतुदी 
 • विविध प्रकारचे बाजार स्थापन करण्याबाबत तरतुदी 
 • बाजार उप तळ म्हणून वखार, सायलो, शीतगृह, इत्यादींकरता तरतुदी 
 • इ नाम, इ व्यापारासाठीच्या तरतुदी  

असे असे प्रशासकीय मंडळ 

 • सभापती - पणनमंत्री अथवा राज्य शासनास योग्य वाटेल अशी कोणतीही व्यक्ती
 • उपसभापती - अपर निंबधक (सहकार) पदापेक्षा कमी दर्जाची नसेल असे अधिकारी
 • महसूल विभागातील एक या प्रमाणे ६ शेतकरी प्रतिनिधी 
 • दोन राज्यातील सरकारने शिफारस केलेले २ शेतकरी प्रतिनिधी
 • संबंधित बाजार समितीमधील पाच परवानाधारक व्यापारी 
 • कृषी प्रक्रिया संस्थेचा १ प्रतिनिधी
 • केंद्रिय किंवा राज्य वखार महामंडळासह, अधिकृत वखार चालकांचे प्रतिनिधी 
 • भारतीय रेल्वेचा प्रतिनिधी 
 • सीमा शुल्क विभागाचा प्रतिनिधी 
 • संबंधित बाजाराला सेवा देणाऱ्या बॅंकेचा प्रतिनिधी 
 • भारत सरकारच्या कृषी पणन सल्लागार विभागाचा अवर सचिव दर्जापेक्षा कमी दर्जाची नसलेली व्यक्ती 
 • महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रतिनिधी 
 • सचिवपदी सहनिबंधक दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला प्रतिनिधी

विशेष वस्तू बाजाराची होणार स्थापना
बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर या बाजार समित्यांना विशेष वस्तूंचा बाजारदेखील घोषित करता येणार आहे. यामध्ये फळे, भाजीपाला, फुले, कांदा, सफरचंद, संत्रा, मनुका, हळद, काजू, कापूस, औषधी आणि सुगंधी वनस्पती, पशुधन (गुरे, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, मासळी, कुकुट आदी) आणि इतर कोणतेही पाच बाजार स्थापन करता येणार आहे. 

संचालक मंडळ होणार तातडीने बरखास्त
राज्य शासनाने राष्ट्रीय नामांकित बाजार तळाची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लगेच विद्यमान बाजार समिती कार्य करणे बंद करील आणि सर्व विद्यमान समिती सदस्य हे आपले पद धारण करणे बंद करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...