agriculture news in Marathi, Appasaheb pawar award function on tomorrow, Maharashtra | Agrowon

डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्काराचे उद्या वितरण
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018

बारामती ः येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डॉ. अप्पासाहेब पवार शेती व शिक्षण पुरस्काराचे वितरण उद्या (ता. १६) शारदानगर येथे होणार आहे.

बारामती ः येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डॉ. अप्पासाहेब पवार शेती व शिक्षण पुरस्काराचे वितरण उद्या (ता. १६) शारदानगर येथे होणार आहे.

 ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख ७५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवारी अप्पासाहेब पवार यांचा १८ वा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षीपासून या पुरस्काराची सुरवात करण्यात आली.

सोमवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात होणार आहे. यावर्षी पुरस्कार समितीने निवडलेल्या पुरस्कारार्थी शेतकरी व विद्यार्थ्यांची घोषणा केली. यासंदर्भात ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी अधिक माहिती दिली. या वर्षीच्या प्रयोगशील शेतकरी पुरस्कारामध्ये देवळा (ता. अंबेजोगाई) येथील रवींद्र भानुदास देवरवाडे व बीड जिल्ह्यातीलच लोळदगाव (ता. कुर्ला) येथील शिवराम जयराम घोडके यांचा समावेश आहे.

प्रगतशील शेतकरी पुरस्कारात कडवंची (जि. जालना) येथील उमा नारायण क्षीरसागर या शेतकरी युवतीचा समावेश असून हरिभाऊ देशपांडे पुरस्कृत पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रगतशील शेतकरी पुरस्कारात सोलापूर जिल्ह्यातील तेलंगवाडी (ता. मोहोळ) येथील रमेश दत्तात्रेय कचरे यांचा समावेश आहे. या वर्षी याच कार्यक्रमात हरिभाऊ देशपांडे पुरस्कृत अप्पासाहेब पवार शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठीही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून यामध्ये तेजस विजय चौधरी यास १ लाखाची शिष्यवृत्ती, प्रसाद हरी लोखंडे यास ४५ हजार रुपयांची तर खुशबू गुलाब बागवान या विद्यार्थिनीस ५५ हजारांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...