agriculture news in Marathi, appeal in high court regarding kharip crop insurance, Maharashtra | Agrowon

खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च न्यायालयामध्ये याचिका
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील पीक नुकसानीचा परतावा मंजूर करण्यात आलेला नाही. पीकविमा परतावाप्रश्नी उपोषण, धरणे झाली, शासनाने विधिमंडळामध्ये आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे कॉ. राजन क्षीरसागर यांनी केंद्र आणि राज्य सरकार, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय विमा नियामक प्राधीकरण (आयआरडीए) यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.

परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील पीक नुकसानीचा परतावा मंजूर करण्यात आलेला नाही. पीकविमा परतावाप्रश्नी उपोषण, धरणे झाली, शासनाने विधिमंडळामध्ये आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे कॉ. राजन क्षीरसागर यांनी केंद्र आणि राज्य सरकार, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय विमा नियामक प्राधीकरण (आयआरडीए) यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.

या संदर्भात माहिती देतांना कॉम्रेड राजन क्षीरसागर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१.१९ कोटी रुपये विमा हप्ता भरला होता. राज्य आणि केंद्र शासन यांचे एकत्रित मिळून २५६.५ कोटी रुपये अनुदान रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला देण्यात आले. विमा कंपनीने जिल्ह्यातील ४ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी १ हजार ४१८ कोटी रुपये विमा परतावा देणे आवश्यक होते. परंतु शेतकऱ्यांना १४८ कोटी रुपये पीकविमा परतावा मंजूर केला. जिल्ह्यातील लिमला, बाभळगाव, आवलगाव आदी मंडळांमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊनही शेतकाऱ्यांना पीकविमा परतावा मंजूर केलेला नाही. राज्य शासनाने सदोष शासन निर्णयाद्वारे रिलायन्स कंपनीची भलावण केली.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे राजन क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी प्रतिवादी करून घेण्यास परवानगी देण्यात आली.

उच्च न्यायालयाने केंद्र शासन, केंद्रीय अर्थमंत्रालय, कृषी मंत्रालय, भारतीय विमा नियामक प्राधिकरण, राज्य शासन, राज्य पीक विमा समिती, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना नोटिसा बजावल्या असून, येत्या ६ मार्चपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

या याचिकेमुळे राज्य शासनाला पीकविमा परताव्यापासून वंचित शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई देण्यासह धोरणात्मक बदल होऊ शकतील, अशी अपेक्षा याचिकाकर्ते कॉ. राजन क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास जोगदंड, रामकिशन दुधाटे यांनी व्यक्त केली.

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...