agriculture news in marathi, appeal to send proposals for 'Export Facilitation Center' | Agrowon

‘निर्यात सुविधा केंद्रा’साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

पुणे : राज्यातून अधिकाधिक शेतमाल निर्यात व्हावा, यासाठी केंद्राच्या ट्रेड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्स्पाेर्ट या केंद्राच्या याेजनेअंतर्गत नवीन निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी आणि जुन्या सुविधा केंद्रांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. सुमारे ६०० काेटी रुपयांच्या निधीची तरतूद असलेल्या या याेजनेअंतर्गत तीन वर्षांत विविध राज्यांमध्ये निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील निर्यात सुविधा केंद्रे उभारणी आणि बळकटीकरणासाठी पणन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.

पुणे : राज्यातून अधिकाधिक शेतमाल निर्यात व्हावा, यासाठी केंद्राच्या ट्रेड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्स्पाेर्ट या केंद्राच्या याेजनेअंतर्गत नवीन निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी आणि जुन्या सुविधा केंद्रांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. सुमारे ६०० काेटी रुपयांच्या निधीची तरतूद असलेल्या या याेजनेअंतर्गत तीन वर्षांत विविध राज्यांमध्ये निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील निर्यात सुविधा केंद्रे उभारणी आणि बळकटीकरणासाठी पणन मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.

पवार म्हणाले, ‘‘विविध उत्पादनांबराेबर शेतमालाच्या निर्यातीला प्राेत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ट्रेड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्स्पाेर्ट याेजना जाहीर केली आहे. २०१७ ते २०२० या तीन वर्षांच्या कालावधी देशात निर्यात सुविधा केंद्रे उभारणी आणि जुन्या निर्यात सुविधा केंद्रांच्या अत्याधुनिकीकरणासाठी ६०० काेटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी २०० काेटींचा निधी वितरित करण्यात येणार असून, महाराष्ट्रातील निर्यात सुविधा केंद्रांचे बळकटीकरण व खासगी क्षेत्राकडून नवीन उभारणी करण्यात येणाऱ्या केंद्रांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्गत कस्टम स्टेशन, गुणवत्ता व प्रमाणीकरण तपासणी प्रयाेगशाळा, शीतसाखळी, ट्रेड प्रमाेशन सेंटर, ड्राय पाेर्टस, गाेदामे, पॅकिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. या याेजनद्वारे प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त २० काेटींचे अनुदान देण्यात येणार आहे.’’

अधिक माहितीसाठी पणन मंडळाच्या ०२०-२४२६११९० या क्रमांकावर अथवा md@msamb.com, genman@msamb.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...