agriculture news in Marathi, Applicant stuck in certificate for loan scheme, Maharashtra | Agrowon

यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेतील अर्जदारांची ‘प्रमाणपत्रा’मुळे गोची
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

परभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना अर्थसाह्यासाठी आवश्यक विनाअट कर्जमंजुरीबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आज (ता. २३)पर्यंतची अंतिम मुदत आहे. परंतु हे प्रमाणपत्र देण्यास अनेक बॅंका नकार देत असल्यामुळे इच्छुक पात्र अर्जदांराची गोची झाली आहे. त्यामुळे विनाअट कर्जमंजुरी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पात्र अर्जदारांनी केली आहे.

परभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना अर्थसाह्यासाठी आवश्यक विनाअट कर्जमंजुरीबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आज (ता. २३)पर्यंतची अंतिम मुदत आहे. परंतु हे प्रमाणपत्र देण्यास अनेक बॅंका नकार देत असल्यामुळे इच्छुक पात्र अर्जदांराची गोची झाली आहे. त्यामुळे विनाअट कर्जमंजुरी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पात्र अर्जदारांनी केली आहे.

जल व मृद संधारणाच्या कामांना गती मिळावी, तसेच ‘स्किल इंडिया’च्या धर्तीवर ग्रामीण भागातून कुशल उद्योजक तयार करणे या दुहेरी उद्देशाने शासनाने जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांना अर्थमूव्हर्स (पोकलेन मशिन) खरेदीसाठी वित्तीय संस्थांकडून १७ लाख ६० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जावरील व्याज शासन भरणार आहे. योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातून ४० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट आहे.

विहित मुदतीत ७०० अर्ज आले असून, छाननीनंतर ४१७ अर्ज पात्र ठरले आहे. या अर्जदारांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून योजनेअंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या Log in ID द्वारे शुक्रवार (२३) पर्यंत ऑनलाइन सादर करावयाचे आहे.

जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी घेतलेल्या बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठकीत या योजनेची माहिती त्यांना देण्यात आली. परंतु अनेक बॅंका या योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बॅंक कर्मचारी कर्जमाफी योजनेच्या कामे तसेच ‘मार्च एंडिंग’च्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे विनाअट कर्जमंजुरी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी पात्र अर्जदारांची मात्र गोची झाली आहे.

विहित मुदतीत हे प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत, तर या योजनेच्या लाभापासून वंचित रहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रमाणत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी आणि बँकांना तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...