फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्ज

फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्ज
फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्ज

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार ३५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश भागात सप्टेंबरमध्ये योजनेसाठीची सोडत झाली. शिवाय पाऊसही बेपत्ता असल्याने प्राप्त अर्जानुसार यंदा या तीनही जिल्ह्यांत फळबाग लागवड होईल का हा खरा प्रश्न आहे.

भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या अर्जामधून ४९ हजार ९८० हेक्‍टरवर फळबाग लागवड होणे अपेक्षित आहे. या योजनेसाठी तीनही जिल्ह्यांकरिता ११ कोटी २९ लाख रुरूपयांचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून १५ हजार ९८३ अर्ज प्राप्त झाले. ३ कोटी ६९ लाख रूपये आर्थिक लक्ष्यांक असलेल्या या जिल्ह्यात १४ हजार १३६ हेक्‍टरवर फळबाग लागवड होणे अपेक्षित आहे.

जालना जिल्ह्यातून फळबाग लागवडीसाठी २४ हजार २७० अर्ज प्राप्त झाले आहेत. २ कोटी ९९ लाख रुपये आर्थिक लक्ष्यांक असलेल्या या जिल्ह्यात २३ हजार ६६४ हेक्‍टरवर फळबाग लागवड अपेक्षित आहे.

बीड जिल्ह्यातून योजनेंतर्गत १४ हजार १०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. ४ कोटी ५९ लक्ष रुपये आर्थिक लक्ष्यांक असलेल्या या जिल्ह्यातही १२ हजार १८० हेक्‍टरवर फळबाग लागवड अपेक्षित आहे. साधारणत: कोणतीही फळबाग लागवड करावयाची असल्यास जून ते जुलैदरम्यान पाऊस काळातच ती लागवड होणे अपेक्षित आहे. त्यासाठीची पूर्वतयारी मे महिन्यातच शेतकऱ्यांनी करणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांकडून सातत्याने सांगितले जाते.

...अन्यथा फळबाग बचाव अभियान ः डॉ. ढवण औरंगाबाद येथे पार पडलेल्या विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या बैठकीत फळबाग लागवडीसाठी प्राप्त अर्ज व लक्ष्यांकाचा विचार करता रोपांच्या उपलब्धतेवर चर्चा झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील वर्षापर्यंत मागणीनुसार विविध फळपिकांची रोपं उपलब्ध व्हावी म्हणून गतिमान रोपनिर्मिती मोहीम हाती घेण्याचे स्पष्ट केले. हे सांगत असतानाच कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी, पडलेला पाऊस व पावसाने दिलेली ओढ पाहता कृषी विभागाने फळबाग लागवडीची अंमलबजावणी सावधगिरीने करण्याची केलेली सूचनाही महत्त्वाची मानली जात आहे. परतीच्या पावसाचीही अवकृपा राहिल्यास २०१२ प्रमाणे फळबाग बचाव अभियान राबविण्याची तयारी ठेवण्याचेही कुलगुरू डॉ. ढवण यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com