agriculture news in marathi, application status of nation horticulture mission scheme, pune, maharashtra | Agrowon

पुणे विभागात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानासाठी ८९ हजारांवर अर्ज दाखल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पुणे   ः कृषी विभागामार्फत चालू वर्षी पुणे विभागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व फळबाग लागवडअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पुणे विभागातून सुमारे ८९ हजार ५९३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातून सर्वाधिक ५६ हजार १५१ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून सर्वात कमी प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून मिळाला असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे   ः कृषी विभागामार्फत चालू वर्षी पुणे विभागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व फळबाग लागवडअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पुणे विभागातून सुमारे ८९ हजार ५९३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातून सर्वाधिक ५६ हजार १५१ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून सर्वात कमी प्रतिसाद पुणे जिल्ह्यातून मिळाला असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, औषधी वनस्पती घटक योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्जप्रक्रियेची सुरवात ६ मार्चपासून सुरू करण्यात आली होती. या योजनेसाठी सुरवातीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद दिसून येत होता. या योजनेअंतर्गत गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य लहान रोपवाटिका तयार करणे, क्षेत्र विस्तार, जुन्य फळबागांचे पुनरुज्जीवन, अळिंबी उत्पादन प्रकल्प, शेततळे, फलोत्पादन यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, कांदा चाळ, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शीतगृह, पॅक हाउस, रायपनिंग चेंबर अशा विविध घटकांसाठी पाच ते २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. 

चालू वर्षी देण्यात येणाऱ्या लाभासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. आलेल्या अर्जाची छाननी करून लॉटरी पद्धतीने निवड करून लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी अर्ज www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. एका कुटुंबातील एकच व्यक्तीचा अर्ज एका घटकांसाठी ग्राह्य धरण्यात आला आहे. याशिवाय फळबाग लागवड करणाऱ्या व्यक्तींनीही अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सीताफळ, लिंबू, नारळ, डाळीब, आंबा अशा विविध फळबागांची लागवड करता येणार असून त्यासाठी दहा ते दोन लाख रुपयांपर्यतचे अनुदान देण्यात येणार आहे. 

यंदा या योजनेच्या लाभ घेण्यासाठी गावांमधील सेवा केंद्र, मंडल कृषी कार्यालयातून अर्ज भरून घेतले जात होते. परंतु इंटरनेटच्या अडथळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे कृषी विभागाने अर्जासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. यंदा राज्यातून तीन लाख ८४ हजार ७४१ अर्ज आले असून औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वाधिक ५९ हजार २१७ अर्ज दाखल झाले आहेत. तर मुंबईतून एक अर्ज दाखल झाला आहे. 
 

जिल्हानिहाय अर्जांची संख्या 
जिल्हा  आलेले अर्ज 
नगर ५६,१५१
पुणे  ८४१५ 
सोलापूर  २५,०२७

 

इतर बातम्या
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...