agriculture news in marathi, applying fodder village scheme in nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्हा परिषद राबवणार चारायुक्त गाव संकल्पना
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 एप्रिल 2018

नगर : दूध उत्पादनाला आधार मिळण्यासह चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यंदापासून प्रायोगिक तत्त्वावर नगर जिल्ह्यामधील काही गावांत ‘चारायुक्त गाव’ संकल्पना राबवली जाणार आहे. त्या गावांतील शेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रमातून बियाणे मोफत दिले जाणार आहे. यंदा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. 

नगर : दूध उत्पादनाला आधार मिळण्यासह चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यंदापासून प्रायोगिक तत्त्वावर नगर जिल्ह्यामधील काही गावांत ‘चारायुक्त गाव’ संकल्पना राबवली जाणार आहे. त्या गावांतील शेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रमातून बियाणे मोफत दिले जाणार आहे. यंदा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. 

जिल्ह्याने गेल्या सात-आठ वर्षांतील साधारण चार ते पाच वर्षे दुष्काळ सोसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम दूध व्यवसायावर झाला आहे. दुष्काळात पाण्याबरोबर चाराटंचाईशी देखील सामना करावा लागला आहे. चारा उपलब्ध झाला नसल्याने अगदी जनावरे जगवण्यासाठी चारा छावण्यात उसाचा चारा वापरावा लागला. दुष्काळात त्यामुळे चाराटंचाईवर मात करत जनावरे जगवली असली तरी पोषण आणि पुरेसा दर्जेदार चारा मिळाला नसल्याने जनावरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला.

या सर्व बाबींमुळे दूध व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जनावरांना दर्जेदार, पोषण चारा उपलब्ध व्हावा आणि दूध व्यवसायाला गती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘चारायुक्त गाव’ अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

काही गावांत प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबवली जाणार असून त्या गाव शिवारात पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने जास्तीत जास्त चारा उत्पादन घेण्यात येईल. चारा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला पशुसंवर्धन विभाग चारा बियाणे मोफत देईल.

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...