मागासवर्गीयांची नियुक्ती खुल्या जागांवर करा : भुजबळ

मागासवर्गीयांची नियुक्ती खुल्या जागांवर करा : भुजबळ
मागासवर्गीयांची नियुक्ती खुल्या जागांवर करा : भुजबळ

नाशिक : सामाजिक आरक्षणासाठी 2014 पूर्वी लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू करावे. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिकांची नियुक्ती करावी. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली. त्यासंबंधाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. भुजबळ म्हणाले, की सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात. मात्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू होत नाही. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत आहे. म्हणून मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या भरतीपासून रोखणारे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी 27 ऑगस्ट 2018 च्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले आहे. हे अपील मागे घेण्याचे निर्देश व्हावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com