कमी उत्पादन आलेल्या मंडळांमध्ये विमा परतावा मंजूर

कमी उत्पादन आलेल्या मंडळांमध्ये विमा परतावा मंजूर
कमी उत्पादन आलेल्या मंडळांमध्ये विमा परतावा मंजूर

परभणी ः खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रतिहेक्टरी उंबरठा उत्पादनापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन कमी आलेल्या जिल्ह्यातील १६ मंडळांतील पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या नुकसानभरपाईबद्दल विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे. केकरजवळा आणि कोल्हा (ता. मानवत) या दोन मंडळांतील सोयाबीनच्या नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १४ हजार ४९८ रुपये विमा परतावा तर पूर्णा मंडळामध्ये मूग पिकाच्या नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी ५७२ रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

२०१८ च्या पावसाळ्यात अनेकवेळा आलेला प्रदीर्घ खंड तसेच अपुरा पाऊस यामुळे जिल्ह्यातील सर्व ३८ मंडळातील खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. परंतु, उंबरठा उत्पादनापेक्षा कमी उत्पादन आलेल्या १६ मंडळांतील पीकविमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी परतावा मंजूर करण्यात आला. नुकतीच इफको -टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने पीकनिहाय मंजूर प्रतिहेक्टरी परतावा रकमेची माहिती कृषी विभागाकडे सादर केली आहे. 

त्यानुसार सोयाबीनसाठी परभणी, सेलू, मानवत या तालुक्यांतील ११ मंडळांमध्ये, मूग पिकाच्या नुकसानीबद्दल जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा तालुक्यातील ५ मंडळांमध्ये, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या नुकसानीबद्दल सेलू, पाथरी, गंगाखेड या तालुक्यांतील प्रत्येकी एका मंडळांमध्ये पीकविमा परतावा मंजूर करण्यात आला आहे. विमा भरपाईसाठी कापूस आणि तूर पिकांच्या उत्पादनाचे अहवाल सादर करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिहेक्टरी प्रत्यक्ष उत्पादन आणि (कंसात) उंबरठा उत्पादन क्विंटलमध्ये सोयाबीन ः परभणी, पेडगाव, जांब ९३४.१ (९६९), सेलू, कुपटा, वालूर, चिकलठाणा बु,, देऊळगाव गात ७३६.८ (७५६), मानवत, केकरजवळा, कोल्हा ५५३.३ (८४५) मूग ः बामणी २५३ (२९८), चिकलठाणा २७४.२ (३२४), मानवत २३०.२ (३२५),पूर्णा २९७.७ (३०७), कात्नेश्वर २८९.२ (३०३). उडीद ः चिकलठाणा २६२.२ (२७२). ज्वारी ः माखणी ४३३.६ (६८५) बाजरी ः हदगाव बु. ४३४.९ (५२४)

मंडळनिहाय प्रतिहेक्टरी मंजूर विमा परतावा सोयाबीन ः परभणी, पेडगाव, जांब (१ हजार ५१२ रुपये), सेलू, वालूर, कुपटा, चिकलठाणा बु. देऊळगाव गात (१ हजार ६६ रुपये), मानवत, केकरजवळा, कोल्हा (१४ हजार ४९८ रुपये), मूग ः बामणी ( २ हजार ८५४ रुपये), चिकलठाणा बु. (२ हजार ९०५ रुपये),मानवत (५ हजार ५१२ रुपये), पूर्णा (५७२ रुपये), कात्नेश्वर (८६० रुपये). उडीद ः चिकलठाणा बु. (६८० रुपये),  ज्वारी ः माखणी (८ हजार ८०८ रुपये)                     बाजरी ः हदगाव बु. (३ हजार ४०० रुपये)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com