agriculture news in marathi, Approval of the proposal for the formation of a draft constitution of the Panchayat Samiti election | Agrowon

पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला मंजुरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

वाशीम : येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या वाशीम जिल्हा परिषद, तसेच जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला अमरावती विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. आता सोमवारी (ता. २७) गट व गणांची आरक्षण सोडत काढली जाणार असून, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. 

वाशीम : येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या वाशीम जिल्हा परिषद, तसेच जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला अमरावती विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. आता सोमवारी (ता. २७) गट व गणांची आरक्षण सोडत काढली जाणार असून, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. 

मुदत संपल्याने येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. 
डिसेंबर महिन्यात विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. ही निवडणूक सन २०११ च्या जनगणनेच्या अनुषंगाने होत असून, वाशीम तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला आहे. पूर्वीच्या नऊ मतदारसंघांपैकी एक आणि दोन गावे वगळून दहाव्या नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली आहे.  काही जिल्हा परिषद मतदारसंघाची नावे कायम असून, दहावा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला. 

लोकसंख्या व चक्रानुक्रमानुसार एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव प्रशासनाने १० आॅगस्टला अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्याला नुकतीच विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

इतर बातम्या
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत...औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार...वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...