सांगलीत ‘कृषी’च्या १ कोटी ४७ लाखांच्या योजनांना मंजुरी

‘कृषी’च्या १ कोटी ४७ लाखांच्या योजनांना मंजुरी
‘कृषी’च्या १ कोटी ४७ लाखांच्या योजनांना मंजुरी

सांगली  : कृषी साहित्य अनुदानाच्या १ कोटी ४७ लाख रुपयांच्या योजनांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. आटपाडी नगरपंचायतसाठी ठरावही मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.

जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी (ता. १०) वारणावती येथे झाली. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरुण राजमाने, तम्मनगौडा रवि-पाटील, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, ब्रह्मदेव पडळकर, सदस्य डी. के. पाटील, संभाजी कचरे, अर्जुन माने-पाटील, नवले, सुरेखा आडमुठे, सुनीता पवार, अश्‍विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आणि खातेप्रमुख उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कृषी साहित्यासाठी अनुदान देण्याच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. पॉवर टिलर खरेदीसाठी शेतकऱ्यांना ठोक स्वरूपात ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी ५० लाखांची तरतूद आहे. चाफकटर खरेदीसाठी २० लाख, पेट्रोकेरोसिन इंजिनसाठी २७ लाख, पाच अश्‍वशक्ती व तीन अश्‍वशक्ती विद्युत पंप खरेदीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे. या सर्व योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी पंचायत समितीकडून आलेल्या प्रस्तावास जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

देशमुख म्हणाले, ‘‘ ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा निवडून विचारलेल्या ४ प्रश्‍नांना उत्तर देऊन जिल्ह्याचे गुणांकन वाढवावे. देशातील स्वच्छ जिल्हा निवडण्यास व ‘स्वच्छ जिल्हा, सांगली जिल्हा’ या मोहिमेस लोकप्रतिनिधी, अधिकारी, जनतेने सहकार्य करावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com