agriculture news in marathi, Approval of 'Sugarcane Harvester's grant | Agrowon

'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास मंजुरी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ४५ नव्या ''शुगरकेन हार्वेस्टिंग'' खरेदीसाठी अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बहुतेक शेतकरीच आघाडीवर आहेत.

साखर कारखान्यांनी यापूर्वी  केन हार्वेस्टरसाठी २५२ हार्वेस्टरचालकांशी करार केले होते. यंदा ९ लाख हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. जादा उसामुळे तोडीसाठी हार्वेस्टरला मागणी वाढली. त्यामुळे कारखान्यांनी यंदा नव्याने ४५ हार्वेस्टरसाठी करार केले आहेत.

पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ४५ नव्या ''शुगरकेन हार्वेस्टिंग'' खरेदीसाठी अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बहुतेक शेतकरीच आघाडीवर आहेत.

साखर कारखान्यांनी यापूर्वी  केन हार्वेस्टरसाठी २५२ हार्वेस्टरचालकांशी करार केले होते. यंदा ९ लाख हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. जादा उसामुळे तोडीसाठी हार्वेस्टरला मागणी वाढली. त्यामुळे कारखान्यांनी यंदा नव्याने ४५ हार्वेस्टरसाठी करार केले आहेत.

"बहुतेक हार्वेस्टर हे शेतकऱ्यांच्याच मालकीचे आहेत. त्यासाठी या शेतकऱ्यांनी कर्ज काढून प्रतियंत्र एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोठी गुंतवणूक बघता साखर उद्योग धंद्यात यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळेच ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे धोरण सहकार विभागाने स्वीकारले आहे. हार्वेस्टरचा व्यवसाय कोणालाही सुरू करता येत असला, तरी यंत्रमालकाशी साखर कारखान्याने करार केला तरच सरकारी अनुदान मिळते,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्याचा ऊस तोडण्याची जबाबदारी राज्यात कायद्यानुसार साखर कारखान्यांची आहे. त्यामुळे हार्वेस्टर वाढविण्यासाठी कारखाने सतत प्रयत्नशील आहेत. हार्वेस्टरला आधी ऊसतोडणी कामगारांचा विरोध होता. मात्र, अलीकडे हा विरोध कमी झाल्यानंतर शासन आणि कारखान्यांनी हार्वेस्टरला प्रोत्साहन दिले. केन हार्वेस्टरसाठी अनुदान मागणी अर्ज मंजुरीचे अधिकार राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील लाभार्थी निवड समितीला देण्यात आलेले आहेत. अनुदान थेट लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात डीबीटीने जमा होते.

"ऊसतोडणीत केन हार्वेस्टरच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाला चालना देणाऱ्या दोनच कंपन्या देशात सध्या कार्यरत आहेत. यात न्यू हॉलंड कंपनीचे ऊसतोडणी यंत्र ९५ लाख रुपये, तर शक्तिमान यंत्र ९२ लाखांच्या आसपास विकले जाते. साखर कारखान्याशी झालेला करार, बॅंक कर्ज प्रस्ताव, यंत्राचे खरेदी बिल, आरटीओ प्रमाणपत्र याबाबी अर्जदाराने सादर करताच अनुदानाचा मार्ग मोकळा होतो," असे सहकार विभागाचे म्हणणे आहे.

पुढील दहा वर्षांत हार्वेस्टरनेच ऊसतोडणी

“उसाची कापणी कारखाने करीत असले तरी सध्या ३५४ रुपये प्रतिटन कापणी खर्च शेतकऱ्यांच्या बिलातून कापून घेतला जातो. यांत्रिकीकरणाचा वेग बघता राज्यात पुढील पाच ते दहा वर्षांत उसाची सर्व कापणी केन हार्वेस्टरने होण्याची शक्यता आहे,” असे मत साखर उद्योग सूत्रांनी व्यक्त केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...