नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी ओलांडली

सोयाबीनच्या क्षेत्राने यंदाही सरासरी ओलांडली
सोयाबीनच्या क्षेत्राने यंदाही सरासरी ओलांडली

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत चालले आहे. यंदा पुरेसा पाऊस नसला तरी पेरणीत सोयाबीनच्या क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. मात्र, गत वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र कमीच आहे. आता वाढ खुंटल्याने आणि पाण्याअभावी शेंगा लागण्याला अडचणी येऊ लागल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

नगर जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळात सोयाबीनचे क्षेत्र वाढू लागले आहे. सध्या ५८ हजार दोनशे ८२ हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र, दीडपट पेरणी झाली होती. यंदाही सरासरीच्या अठरा टक्के जास्त म्हणजे ६९ हजार ३१५ हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.

सर्वाधिक कोपरगाव तालुक्‍यात यंदा १७,४३७ हेक्‍टर, राहाता तालुक्‍यात १४,५७१ हेक्‍टर, श्रीरामपूरला १०,६२९ हेक्‍टर, अकोले तालुक्‍यात १०,३८१, हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली असून, त्यापाठोपाठ नगर तालुक्‍यात ३९३४, जामखेडला ३३५७, नेवाशाला २२५४ हेक्‍टरवर तर संगमनेरला ३५२४ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. श्रीगोंदा, कर्जत, पारनेरला क्षेत्र कमी आहे. यंदा सुरवातीपासूनच पाऊस जोरदार नसल्याने क्षेत्रात फारशी वाढ झाली नाही. मात्र, सध्या पाऊस नसल्याचा सोयाबीनवर गंभीर परिणाम झाला आहे. पिकांची वाढ खुंटलेली असून, शेंगा लागण्यालाही अडचणी येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

तेलबियांचे क्षेत्र घटतेच नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र चांगले असले तरी अन्य भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल या तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात मात्र सातत्याने घट होत आहे. यंदा भुईमुगाची पेरणी सरासरीपेक्षा जास्ती झाले आहे; पण तिळाची ३४ टक्के, कारळ्याची ७ टक्के, सूर्यफुलाची १० टक्केच पेरणी झाली आहे. मुळात कारळे, भुईमूग, तीळाचे मिळून अवघ्या जिल्ह्यामध्ये ७ हजार २७३ हेक्‍टर सरासरी क्षेत्र असून, तीन पिकांची अवघी ७३८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तेलबियांचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाकडून काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com