agriculture news in marathi, the area below papai starts empty, dhule, maharashtra | Agrowon

नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील पपईखालील क्षेत्र रिकामे होण्यास सुरवात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यावर पुढे केळी किंवा कापूस पिकाची लागवड केली जाईल. काही शेतकरी कच्ची फळे चेरी कारखानदारांना देत आहेत; परंतु पुढील १० ते १२ दिवसांत क्षेत्र रिकामे होईल. 

- सुनील पाटील, मनरद, जि. नंदुरबार.
धुळे  ः नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील पपई पिकाखालील क्षेत्र रिकामे व्हायला सुरवात झाली आहे. उष्णतेमुळे पपईची मागणी कमी झाली आहे. त्यातच फळांचा आकारही हवा तसा नसतो. त्यामुळे अधिक दिवस पपईचे पीक न घेण्याचा कल शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. 
 
धुळ्यात सुमारे ८०० तर नंदुरबारात सुमारे १२०० हेक्‍टरवर पपईची लागवड झाली होती. सर्वाधिक लागवड शहादा (जि. नंदुरबार) व शिरपूर (जि. धुळे) भागात झाली होती. यंदा तीन वेळा पपईदराचा तिढा निर्माण झाला.
 
नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी पपईची काढणी बंद पाडली. सात रुपये प्रतिकिलो दर मागितला होता. नंतर सहा रुपये ७५ पैसे दरांवर व्यापारी व शेतकऱ्यांचे एकमत झाले. पुन्हा जानेवारीत दराचा तिढा निर्माण झाला. या वेळेसही व्यापाऱ्यांनी दर कमी करा, अशी मागणी केली. त्यावर सहा रुपये ३५ पैसे दर निश्‍चित झाले. शहादा येथे त्यासाठी शेतकरी व व्यापारी यांच्या बैठका झाल्या. पुन्हा फेब्रुवारीत दरांचा मुद्दा व्यापाऱ्यांनी पुढे केला. 
 
अशातच पपई हे उष्ण फळ असल्याने जशी उष्णता वाढायला लागली, तशी तिची मागणी ग्राहकांमध्ये कमी झाली. मार्चमध्ये चेरी कारखान्यांकडून मागणी कायम राहिली आहे. कारखानदार तीन रुपये प्रतिकिलो या दरात पपईची खरेदी करीत आहेत. यातच पपईचा हंगामही अंतिम टप्प्यात आल्याने क्षेत्र रिकामे करायला सुरवात झाली आहे.
 
क्षेत्र रिकामे करण्यासाठी ट्रॅक्‍टरचा उपयोग केला जात असून, सुरवातीला कच्ची फळे काढून झाडे नष्ट केली जात आहेत. ट्रॅक्‍टरचालक एकरी १००० रुपये असे दर क्षेत्र रिकामे करण्यासाठी घेत आहेत. काही शेतकरी मजुरांच्या साह्याने झाडे काढत आहेत. 
 
तळोदा तालुक्‍यात मात्र अजूनही अनेक शेतांमध्ये पपईचे पीक आहे. या भागातून मध्य प्रदेश व गुजरातचे व्यापारी चेरी कारखान्यासाठी पपईची कच्ची फळे नेत आहेत, असे सांगण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...