agriculture news in marathi, The area of the gram increased in Marathwada | Agrowon

हरभऱ्याचे क्षेत्र वाढले; ज्वारी, गव्हाचे घटले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीसह गहू व मक्‍याचे क्षेत्र घटले असून, हरभऱ्याचे क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा अपेक्षित पेरणीचा टप्पा ओलांडताना सर्वसाधारण १८ लाख ६ हजार हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १८ लाख ५७ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीसह गहू व मक्‍याचे क्षेत्र घटले असून, हरभऱ्याचे क्षेत्र मात्र वाढले आहे. यंदा अपेक्षित पेरणीचा टप्पा ओलांडताना सर्वसाधारण १८ लाख ६ हजार हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १८ लाख ५७ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

गतवर्षी मराठवाड्यात १८ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी अपेक्षित होती. फेब्रुवारीच्या मध्यान्हातील अहवालानुसार गतवर्षी मराठवाड्यात २० लाख ८९ हजार हेक्‍टरवर, अर्थात ११६ टक्‍के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा मात्र ११ जानेवारीअखेरच्या अहवालानुसार सर्वसाधारण १८ लाख ६ हजार हेक्‍टरच्या तुलनेत १८ लाख ५७ हजार हेक्‍टरवर, अर्थात अपेक्षेच्या केवळ १०२ टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे.

गतवर्षी मराठवाड्यातील रब्बी ज्वारीची पेरणी ८ लाख १७ हजार हेक्‍टरपुढे गेली होती. ती यंदा ६ लाख २६ हजार हेक्‍टरवरच अडकली आहे. दुसरीकडे गव्हाची गतवर्षी ३ लाख १७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र गहू २ लाख ५० हजार हेक्‍टरवरच अडकला आहे. गतवर्षी ६७ हजार हेक्‍टरपुढे गेलेली मक्‍याची पेरणीही यंदा ४१ हजार ८०० हेक्‍टरवरच अडकली आहे.

दुसरीकडे गतवर्षी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १९१ टक्‍के क्षेत्रावर, अर्थात ८ लाख २० हजार हेक्‍टरवर असलेले हरभऱ्याचे क्षेत्र यंदा सर्वसाधारण ४ लाख २६ हजार हेक्‍टरच्या तुलनेत ८ लाख ९० हजार हेक्‍टरवर, अर्थात अपेक्षेच्या २०८ टक्‍क्‍यांवर पोचले आहे.

गळीत धान्याचा पेरा घटला

गतवर्षी मराठवाड्यात रब्बी ज्वारी, गहू, मका, इतर तृणधान्यांचा १२ लाख ६ हजार हेक्‍टरवर पेरा झाला होता. यंदा तो ९ लाख ३० हजार हेक्‍टरवर अडकला आहे. हरभरा व इतर रब्बी कडधान्यांचा ८ लाख २० हजार हेक्‍टरवर असलेला पेरा यंदा मात्र जवळपास ७० हजार हेक्‍टरने वाढून ८ लाख ९१ हजार हेक्‍टरवर पोचला आहे. गतवर्षी रब्बी तीळ, करडई, जवस, सूर्यफूल, इतर गळीतधान्य मिळून ६२ हजार ७०० हेक्‍टरवर झालेला पेरा यंदा ३५ हजार ३०० हेक्‍टरवरच अडकला असल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
तीन जिल्ह्यांत एक लाख क्‍विंटल तूर... औरंगाबाद  : खरेदी केंद्रे सुरू होऊन तूर...
नांदेड विभागातील बत्तीस कारखान्यांकडून... नांदेड  ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
बुलडाण्यातील २९ लघू प्रकल्प कोरडे बुलडाणा : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत...
सोलापूर जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी सोलापूर  : राज्य शासनाने पाणीटंचाईवर...
पूर्व विदर्भात धानाची उत्पादकता हेक्टरी... नागपूर  ः कमी पाऊस त्यासोबतच हंगामात...
जळगाव जिल्ह्यात गव्हाची आवक वाढतेय जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ऊस पाचट व्यवस्थापनाकडे... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात गोदामे उपलब्ध नसल्याने... जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी रखडली असून...
सूक्ष्म सिंचनाद्वारे खतांचा कार्यक्षम...फर्टिगेशनमुळे खते आणि पाणी कार्यक्षमपणे पिकांच्या...
पुणे जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०३ लाख... पुणे  ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा...
पुणे जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरूपुणे  ः दिवसेंदिवसे शेतीकामांसाठी मजुरांचा...
ढगाळ हवामानाचा काजू उत्पादनाला फटकासिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस...
कृषी विभागाच्या योजनांना गती द्या :...मुंबई : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना...
अॅग्री बिझनेस पदवीसाठी 'आयसीएआर'ची समितीपुणे : देशातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी...
कोयना धरणातील पाणीसाठा २५ टीएमसीने...मुंबई : कोयना धरणामध्ये २५ टीएमसी पाणीसाठा...
ग्रीन रिफायनरी ठेवणार की घालवणार?मुंबई  : राजापूर तालुक्यात प्रस्तावित...
तीव्र पावसाचा हायड्रोपोनिक्स...कॅलिफोर्नियातील अवकाळी आलेल्या तीव्र पावसाचा फटका...
स्वस्त धान्य दुकानदारांना पगार सुरू करा...मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य...
ग्रीन रिफायनरी ठेवणार की घालवणार?मुंबई  : राजापूर तालुक्यात प्रस्तावित...
`डाळिंब निर्यातीतील अडथळे एकत्रित...सोलापूर  : डाळिंबाच्या उत्पादनातील शास्त्रीय...