agriculture news in marathi, area of paddy may be increase in kharip, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018
यंदा चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भात पिकाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात सरासरीएवढीच खरीप पिकांची पेरणी होईल, असा विश्वास आहे. 
- बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे
पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांची दोन लाख ३० हजार ८२६ हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज असून सुमारे ६४ हजार ८०० हेक्‍टरवर भात लागवड अपेक्षित आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात दोन लाख ५ हजार ७३७ हेक्‍टरवर विविध खरीप पिकांची पेरणी झाली होती. तीन लाख २४ हजार ६८३ मेट्रीक टन पीक उत्पादन झाले होते. यंदा पावसाच्या चांगल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची एप्रिलपासूनच खरिपाची तयारी सुरू आहे.
 
भात पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेतीची मशागतीची कामे हाती घेतली आहे. काही शेतकरी भात बियाणांची उगवणक्षमता तपासून घेण्यास प्राधान्य देत आहेत. पूर्व पट्ट्यातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर भागांतही शेतकऱ्यांनी नांगरणी करून पेरणीकरिता शेत तयार ठेवण्यासाठी कामे सुरू केली आहे.
 
खरिपात तृणधान्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका या पिकांची पेरणी शेतकरी करतात. कडधान्यामध्ये तूर, मूग, उडीद तर गळीतधान्यामध्ये भूईमूग, खरीप तीळ, कारळा, सुर्यफूल, सोयाबीन या पिकांची शेतकरी पेरणी करतात.
 
गेल्यावर्षी भाताची ५९ हजार ४४५ हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा भात लागवडक्षेत्रात ५३५५ हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रातदेखील वाढ होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी सोयाबीनची १८ हजार ६६३ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८३७ हेक्‍टरने क्षेत्र वाढण्याची शक्‍यता असून सुमारे २२ हजार ५०० हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे, तर उत्पादन ६० हजार ७५० मेट्रिक टन एवढे अपेक्षित आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...