agriculture news in Marathi, The area under sugarcane cultivation is 14 thousand 650 hectare | Agrowon

सातारा : ऊस लागवड क्षेत्रात १४ हजार ६५० हेक्‍टरने घट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 मार्च 2019

सातारा ः एकरकमी एफआरपी, पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा आदी कारणांमुळे जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आडसाली व पूर्व हंगामात सुमारे १४ हजार ६५० हेक्‍टरने घट झाली आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस कमी पडणार असल्याने साखरेच्या उत्पादनात घट होणार होणार आहे. 

सातारा ः एकरकमी एफआरपी, पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा आदी कारणांमुळे जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आडसाली व पूर्व हंगामात सुमारे १४ हजार ६५० हेक्‍टरने घट झाली आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस कमी पडणार असल्याने साखरेच्या उत्पादनात घट होणार होणार आहे. 

जिल्ह्यात सुरू असलेल्या गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने गाळप हंगाम गतीने सुरू आहे. सर्वच कारखान्यांची उद्दिष्टापेक्षा जास्त गाळप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पुढील हंगामाचे चित्र बदलणार असून आडसाली व पूर्वहंगामात होणाऱ्या लागवडीत घट झाली आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढत असून सध्या जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या १६ वर गेली आहे. मात्र, उसाच्या क्षेत्रात घट होत आहे. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात आडसाली हंगामात २३ हजार ९४ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. 

या वर्षीच्या १८ हजार २३५ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. २०१७-१८ च्या तुलनेत या वर्षी सुमारे चार हजार ८५९ हेक्‍टरने लागवड क्षेत्र घटले आहे. तर पूर्व हंगामात गतवर्षी २२ हजार ५८३ लागवड झाली होती. २०१७-१८ मध्ये १२ हजार ७९५ उसाची लागवड झाली होती. पूर्व हंगामात नऊ हजार ७८८ हेक्टर घट झाली आहे. आडसाली व पूर्वहंगामात मिळून १४ हजार ६५० हेक्टरने घट झाल्याने पुढील गाळप हंगामावर मोठा परिमाण होणार आहे. 

आडसाली ऊस हा शेतकऱ्यांनाही उत्पादन देणारा असतानाही शेतकऱ्यांकडून क्षेत्र कमी केले जात आहे. याचे प्रमुख कारण सरासरी पावणेदोन ते दोन वर्ष शेतात राहतो. यामुळे उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीबरोबर अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. अपुरा पावसाने होत असलेली पाणीटंचाई व एकरकमी एफआरपी यांचा वाईट परिणाम लागवडी होत असल्याचा शेतकरी सांगत आहे. उसाच्या क्षेत्र घटीचा परिणाम गाळप हंगामावर होणारा आहे. एकीकडे कारखान्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडी क्षेत्राची होणारी घट यामुळे पुढील हंगामात उसाची पळवापळवी होणार आहे. तसेच साखर उत्पादनात घट होणार आहे.

सुरू व खोडवा उसावर हंगामाचे भविष्य 
जिल्ह्यात विविध कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात होणारी घट ही साखर कारखान्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय होणार आहे. अजूनही सुरू हंगामाच्या उसाच्या लागवडी सुरू आहेत. तसेच खोडवा ऊस क्षेत्र किती शेतकरी ठेवणार यावर पुढील गाळप हंगामाचे भविष्य ठरणार आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने गाळप हंगाम या वर्षीच्या तुलनेत लवकर संपणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...