agriculture news in marathi, area of wheat decline, nagpur, maharashtra | Agrowon

नागपूर जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र आठ हजार हेक्‍टरने घटले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गहू लागवड क्षेत्र कमी झाले आहे. हरभरा लागवड क्षेत्रात या वर्षी चार हजार हेक्‍टरने वाढ नोंदविली गेली आहे. गव्हाचे लागवड क्षेत्र ८ हजार हेक्‍टरने कमी झाले आहे. नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवडीकडेदेखील जिल्ह्यातील शेतकरी वळाले आहेत.
- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर.

नागपूर  :  पेंच प्रकल्पामुळे उद्‌भवलेला पिकाच्या पाणी प्रश्‍नामुळे जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू लागवड क्षेत्रात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल आठ हजार हेक्‍टरने घट नोंदविण्यात आली आहे. यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान परिणामी पुरेशी ओल नसणे आणि सिंचनासाठी पाण्याच्या उपलब्धतेची अडचण अशी अनेक कारणे यामागे दिली जात आहेत.

जिल्ह्याचे रब्बी पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६२ हजार ५७२ हेक्‍टर इतके आहे. यावर्षी एक लाख ६७ हजार ८१६ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या १०३ टक्‍के क्षेत्रावर पिकांची लागवड झाली आहे. परंतु यावर्षीच्या रब्बी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी हरभरा लागवडीवर भर दिला.

गेल्या वर्षी २०१५-१६ च्या रब्बी हंगामात ८४ हजार ५२२ हेक्‍टरवर गहू लागवड होती. यावर्षी त्यात आठ हजार हेक्‍टरची घट होत हे क्षेत्र ७५ हजार ३०२ वर आले आहे. याउलट गेल्या वर्षी अवघ्या ७८ हजार हेक्‍टरवर असलेल्या हरभरा क्षेत्रात चार हजार हेक्‍टरची वाढ नोंदविली गेली आहे. मिरची व भाजीपाल्यासारख्या नगदी पिकांवरदेखील शेतकऱ्यांनी यावर्षी भर दिल्याचे चित्र आहे. गव्हाखालील कमी झालेले काही क्षेत्र या पिकाखाली आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...