agriculture news in Marathi, argent meeting in Nashik District bank, Maharashtra | Agrowon

कर्जवसुली प्रश्नी नाशिक जिल्हा बँकेची आज तातडीची बैठक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

नाशिक : नाशिक जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमोरच विषप्राशन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन अडचणीत अाले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी (ता. २८) संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. 

नाशिक : नाशिक जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमोरच विषप्राशन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन अडचणीत अाले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी (ता. २८) संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. 

कर्जदारांनी अशी भूमिका घेतल्यास बॅँकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हा बॅँकेला जवळपास २२०० कोटी रुपये मार्चअखेर वसूल करण्याचे आव्हान असून, अधिकाधिक कर्ज वसुली केल्यावरच बॅँकेचे गतवैभव प्राप्त होऊन गरजू शेतकऱ्यांना पुढील काळात कर्जपुरवठा करणे शक्य होणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कर्जवसुली मोहिमेंतर्गत रविवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे वसुली पथकासमोरच मुकुंद वाजे या कर्जदाराने विषप्राशन केल्याची घटना घडली. अशा घटनेतून कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कर्जदारांना तगादा लावायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़.

पांढुर्ली येथील घटनेने अन्य कर्जदारदेखील त्याच पावलावर पाऊल ठेवून आत्महत्येची धमकी देत वसुलीत खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतील अशा परिस्थितीत नेमके काय करावे, यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात बुधवारी (ता. २८) सर्व संचालकांची बैठक बोलविण्यात आल्याचे सांगितले. 

मुकुंद वाजे यांच्याकडे २००६ पासून कर्ज थकले असून, त्यासाठी वेळोवेळी नोटिसाही देण्यात आल्याचे व पुरेसा वेळही दिला गेल्याचे सांगण्यात आले.

वसुलीचा तगादा
जिल्हा बॅँकेने मार्चअखेरीस बड्या व जुन्या थकबाकीदार शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला असून, त्यातून वाहन कर्जापोटी ट्रॅक्टर जप्तीची मोहीम सुरू आहे. ऐपतदार शेतकऱ्यांच्या मालमत्तांवर कर्जापोटी बोझा चढविण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...