agriculture news in Marathi, army worm attack on jowar, Maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (फाॅल आर्मीवर्म-स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा) प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. इटलापूर (ता. परभणी) येथील शेतकरी बाळासाहेब पुंड यांच्या शेतातील ज्वारीवर ही अळी आढळून आली आहे. यापूर्वी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील मक्यावर ही अळी आढळली होती.

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (फाॅल आर्मीवर्म-स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा) प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. इटलापूर (ता. परभणी) येथील शेतकरी बाळासाहेब पुंड यांच्या शेतातील ज्वारीवर ही अळी आढळून आली आहे. यापूर्वी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील मक्यावर ही अळी आढळली होती.

इटलापूर येथील शेतकरी बाळासाहेब पुंड यांनी आॅक्टोबर महिन्यात दीड एकरांवर रब्बी ज्वारीची पेरणी केली. परंतु पाने तसेच पोंगे कुरतडल्याचे निदर्शनास येताच पुंड यांनी शोध घेतला असता अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. पाने, पोंगे कुरतडल्यामुळे ज्वारीची वाढ खुंटली होती. कीटकनाशकांच्या दोन फवारण्या केल्यामुळे ही कीड काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे पुंड यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यात मक्यावर आढळून आलेल्या या अमेरिकन लष्कारी अळीने आता रब्बी ज्वारीकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या महिन्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पिकांवर ही अळी आढळली होती. मका, ऊस या पिकांनंतर ज्वारीत ही अळी आढळल्याची नोंद झाली आहे. 

ही अळी ज्वारीचे पाने कुरतडून पोंग्यामध्ये शिरते. ही अळी अतिशय खादाड आहे. तिच्या विष्ठेमुळे पानांची प्रत खराब होते. या अळीचा प्रसार खूप वेगाने म्हणजेच एका रात्रीमध्ये पतंग १०० किलोमीटर अंतर पार करून जातो. सध्या रब्बी ज्वारी, मकाची पेरणी सुरू आहे. वेगवेगळ्या कालावधीत पेरणी केली जात असल्यामुळे या अळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. यामुळे अळीचे जीवनचक्र वर्षभर सुरू राहाते. ज्वारीवर पहिल्या दीड महिन्याच्या कालावधीत ही अळी आढळून येते. यंदा उद्‌भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी ज्वारीचा पेरा घटल्याने येत्या काळात चाराटंचाई भासणार आहे. या परिस्थितीत ज्वारी, मका आदी चारा पिकांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळेवर ओळखण्यासाठी शेतकऱ्यांनी दररोज ज्वारीच्या पिकांची निरीक्षणे घ्यावीत.

प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर या अळीच्या व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, चारा तसेच धान्याच्या उत्पादनात मोठी घट येऊ शकते, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॅा. बि. व्ही. भेदे यांनी सांगितले.

...असे करा व्यवस्थापन
अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि तो कमी असल्यास प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावेत. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अर्थात, पीकनिहाय ‘सीआयबीआरसी’ मान्यताप्राप्त शिफारशीनुसार फवारणीसाठी थायामेथोक्झाम (१२. ६ टक्के अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) १२५ मिलि प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकरी दोन या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत.

तज्ज्ञ म्हणतात...
यंदा उद्‌भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे येत्या काळात चाराटंचाई होऊ शकते. अमेरिकन लष्करी अळी या बहुभक्षी, खादाड किडीचा प्रसाराचा वेग जास्त असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तत्काळ उपायोजना केल्यास तिचे नियंत्रण होते असे ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. बी. भोसले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर व कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे यांनी सांगितले.
 : डॉ. बी. व्ही. भेदे, 7588082028

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...