agriculture news in marathi, Arrange for feed, water: MLA Deshmukh | Agrowon

चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार गणपतराव देशमुख
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर अाहे. पाणी, शेती, रोजगार यासह जनावरांचे हाल होत आहेत. शासनाच्या वतीने मोठ्या जनावरांसाठी छावण्या सुरू झाल्या आहेत. त्याच पद्धतीने सरकारने शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्याची सोय करावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनी दिली.

सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर अाहे. पाणी, शेती, रोजगार यासह जनावरांचे हाल होत आहेत. शासनाच्या वतीने मोठ्या जनावरांसाठी छावण्या सुरू झाल्या आहेत. त्याच पद्धतीने सरकारने शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्याची सोय करावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनी दिली.

डोंगरगाव (ता. सांगोला) येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने सुरू केलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या छावणीस देशमुख यांनी भेट दिली. संस्थेचे ललित बाबर, ज्ञानेश्‍वर ठोकळे, नंदू मोरे, दिनकर कांबळे, पांडुरंग बाबर, विशालदीप बाबर, अर्जुन बाबर, श्रावण बाबर, तुळशीराम कांबळे, रमेश कांबळे आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, ‘‘डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या छावणीमुळे परिसरातील काही शेळ्या-मेंढ्यांच्या चारा व पाण्याची सोय झाली आहे. या छावणीचा आदर्श समोर ठेवून सरकारने महाराष्ट्रातील लहान जनावरांच्या चारा पाण्यासाठी प्रती शेळी मागे २० रुपये अनुदान द्यावे. तसे धोरण करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवले.  २००१ ला शेळ्या-मेंढ्यांच्या चारा छावणीसंदर्भात शासन निर्णय करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही.’’

ललित बाबर यांनी शेळ्या-मेंढ्यांसाठी एक मेपासून डोंगरगाव या ठिकाणी छावणी सुरू केली आहे. त्यात डोंगरगाव, गळवेवाडी, सोनंद व परिसरातील ५०० शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्या आहेत. दररोज त्यांना गोळी पेंड, हरभरा भुसा, मका, लहान शेळ्या-मेंढ्यांसाठी हायड्रोपोनिक पद्धतीने निर्माण केलेला चारा दिला जात आहे. एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, इकोनेट, कासा, एक्‍शन एड व अन्य काही संस्थांच्या सहकार्यातून ही छावणी चालवली जात आहे. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर ठोकळे यांनी आभार मानले.

इतर बातम्या
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...