agriculture news in marathi, Arrange the fodder, water: Bhuse | Agrowon

धुळे जिल्ह्यात चारा, पाण्याची व्यवस्था करा: भुसे
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

धुळे : जिल्ह्यात यंदा पुरेशा पावसाअभावी गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावासाठी पिण्याचे पुरेसे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा, प्रत्येक गावात रोजगारासाठी किमान दोन कामे करावीत, त्यानुसार जुलै २०१९ पर्यंतचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले.

धुळे : जिल्ह्यात यंदा पुरेशा पावसाअभावी गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावासाठी पिण्याचे पुरेसे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा, प्रत्येक गावात रोजगारासाठी किमान दोन कामे करावीत, त्यानुसार जुलै २०१९ पर्यंतचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शुक्रवारी (ता. २६) दुपारी पाणी आरक्षणाबाबत बैठक झाली. आमदार डी. एस. अहिरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पढ्यार आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ‘‘जनावरांसाठी आवश्‍यक पाण्याचाही समावेश करावा. उर्वरित पाण्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याचे किती आवर्तने देता येतील, याचे नियोजन करावे. त्यानुसार शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके घेण्याबाबत सूचना कराव्यात. पाणी सोडताना त्याची कमीत कमी गळती होईल, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात.``

चारा लागवडीस प्रोत्साहन द्या
पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकऱ्यांना चारा पिके लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. अन्य जिल्ह्यांत चारा वाहतूक होणार नाही, अशी उपाययोजना करावी. जिल्ह्यातील एखाद्या गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी वनविभागाची जमीन आवश्‍यक असेल, तर याबाबत तत्काळ कार्यवाही करावी. जंगलातील वन्यपशूंसाठी जंगलातच पाणवठ्यांची उपाययोजना करावी, असे निर्देशही भुसे यांनी दिले.

रेखावार म्हणाले, ‘‘जिल्ह्यास बाहेरून पाणी आणावे लागणार नाही. चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल.``

इतर बातम्या
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...