agriculture news in Marathi, arrival of jaggery in sangali, Maharashtra | Agrowon

सांगलीत गुळाची आवक वाढली
अभिजित डाके
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सांगली ः येथील बाजार समितीत गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात ४५७ क्विंटलने गुळाची आवक अधिक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३५६७ ते ४३६५ रुपये, तर सरासरी ३९६६ असा दर मिळाला. चालू सप्ताहात गुळाच्या दरात तेजी राहिली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली ः येथील बाजार समितीत गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात ४५७ क्विंटलने गुळाची आवक अधिक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३५६७ ते ४३६५ रुपये, तर सरासरी ३९६६ असा दर मिळाला. चालू सप्ताहात गुळाच्या दरात तेजी राहिली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हळदीची आवक गतसप्ताहापेक्षा ३० क्विंटलने वाढली आहे. राजापुरी हळदीची ६७ क्विंटल आवक झाली होती. तीस प्रतिक्विंटल ६१६७ ते ९००० रुपये दर मिळाला. परपेठी हळदीची ६८ क्विंटल आवक झाली होती. या हळदीस ५९०० ते ७७५० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळ दुय्यम बाजार आवारात कांद्याची १०९४८ क्विंटल झाली होती. कांद्यास ५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. बटाट्याची ५६३७ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात लसणाची आवक सरासरी १०० क्विंटलने कमी झाली आहे. चालू सप्ताहात २३३ क्विंटल आवक झाली होती. त्यास ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता.

सफरचंदाच्या आवकेत गतसप्ताहापेक्षा १०० पेट्यांनी वाढ झाली आहे. चालू सप्ताहात सफरचंदाची १०५८१ पेट्यांची आवक झाली होती. सफरचंदास ८०० ते २००० रुपये प्रतिपेटीस दर होता. आल्याची आवक वाढली होती, १७ क्विंटल आवक होऊन त्यास १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. संत्र्यांची ११५० डझन आवक झाली होती. त्यास २०० ते ३०० रुपये प्रतिदहा किलोस असा दर मिळाला होता. गतसप्ताहापेक्षा डाळिंबाची आवक २००० डझनांनी वाढली आहे. चालू सप्ताहात ४३६५८ डझन आवक झाली होती. त्यास २०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलोस असा दर होता.

हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते २५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची दररोज २०० ते ३०० पोत्यांची आवक होते. भेंडीला ७० ते १०० रुपये असा दर मिळाला. भेंडीची दररोज २२५ करंड्यांची आवक होते.

गतसप्ताहातील शेतमालीची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतीमाल     आवक     किमान     कमाल     सरासरी
खपली     ३५     १७००     १७८३     १७४२
हरभरा     २८     ४३१७     ४९१७     ४६१७
मूग     ५६     ५५७५     ६०००     ५७८८
मटकी     ७९     ४५००     ६५१७     ५५०८
उडीद     २८     ५४००     ५५००     ५४५०
ज्वारी (हायब्रीड)  २७     १७००     २०१७     १८५८
ज्वारी (शाळू)  ३०     १७५०     २६६७     २२०८
गहू     ४०     १७१७     २६६७     २१९२
तांदूळ     ७०     २१४२     ६४००      ४२७१
वाटाना     ४५     ३०००     ३२००     ३१००
मसूर     ४५     ४२२०     ४५२०     ४३७०

 

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...