agriculture news in Marathi, Arrival of pomegranate decrease in Nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकला डाळिंबाची आवक घटली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

बदलत्या वातावरणामुळे डाळिंब पिकाचे नुकसान झाल्याने अपेक्षित गुणवत्तेचा माल बाजारात येत नाही. त्यातच देशभरातील बाजारपेठांत आवक घटल्यामुळे डाळिंबाचा उठाव घटला आहे.
- मनोज झाडे, बाजार निरीक्षक, बाजार समिती, नाशिक.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील  बाजारात डाळिंबाची आवक ७० टक्‍क्‍यांनी घटली आहे. देशभरातील दिल्ली, कोलकता, जयपूर, इंदूर, अहमदाबाद, कानपूर, बंगळूर, चेन्नई या बाजारांतून स्थिर मागणी होत आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील बाजारात डाळिंबाला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १२०० ते १६०० व सरासरी १४०० रुपये दर मिळाले. अजून दोन महिने तरी डाळिंंबाचे दर स्थिर राहतील. फेब्रुवारीनंतर डाळिंबाला उठाव वाढेल, असे जाणकारांनी सांगितले. 

नाशिक जिल्ह्यातील नाशिक बाजार समितीच्या पेठ रोड येथील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये गत सप्ताहात रोज सरासरी १५०० क्रेटची आवक झाली. याच वेळी नाशिकच्या नांदूर भागातील परफेक्‍ट बाजार या डाळिंबाच्या खासगी बाजार समितीत १८०० क्रेटची आवक झाली. संपूर्ण जिल्ह्यात दररोज ३५०० क्रेटची आवक झाली. नोव्हेंबर महिन्यापासून ही आवक कमी कमी होत आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या आवकेत ६० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात ही आवक ५५०० क्रेटची होती. या स्थितीत परराज्यांतील बाजारपेठांत डाळिंबाला स्थिर मागणी असून, दरही स्थिर आहेत. ढगाळ पावसाळी वातावरणामुळे डाळिंब उत्पादक चिंतेत आहेत. या वातावरणामुळे पक्वतेच्या टप्प्यातील डाळिंबाची गुणवत्ता मिळण्यास अडचण येत आहे. देशभरातील फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढली आहे.

नाशिक भागातून दिल्ली, कोलकता, जयपूर, इंदूर, अहमदाबाद, कानपूर, बंगळूर, चेन्नई या बाजारपेठांत डाळिंब माल पाठवला जातो. या बाजारपेठांच्या स्थानिक भागांत डाळिंबाची लागवड वाढली असून, त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. गत सप्ताहातील डाळिंबाची दररोज आवक (क्रेट) : ३५००.  मिळालेले दर (प्रतिक्रेट) : १२०० ते १६०० व सरासरी १४०० रुपये

प्रतिक्रिया
डाळिंबाची लागवड देशभरात वाढलेली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश यात आघाडीवर आहे. या स्थितीत या सर्व भागांतून आवक वाढल्याने त्याचा बाजारावर परिणाम झाला आहे. ऑगस्टमध्ये पक्वतेच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारीदरम्यान डाळिंबाची आवक कमी होईल व उठाव वाढेल अशी स्थिती आहे.
- किरण वाघ, प्रयोगशील डाळिंब उत्पादक. 
 

इतर अॅग्रो विशेष
पैशाकडेच जातोय पैसाभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात...
वाढवूया मातीचा कससंयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी...
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...
खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेतीखारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे,...
वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून...भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...