agriculture news in Marathi, arrival of tomato and green chili is stable in jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात टोमॅटो, हिरव्या मिरचीची आवक स्थिरावली
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतसप्ताहात टोमॅटो व मिरची वगळता इतर भाजीपाल्याची आवक वाढतच गेली. मेथी, गिलके, कोबी, भरीताचे वांगे यांच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. मिरची व टोमॅटोचे दरही स्थिर राहिले. 

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतसप्ताहात टोमॅटो व मिरची वगळता इतर भाजीपाल्याची आवक वाढतच गेली. मेथी, गिलके, कोबी, भरीताचे वांगे यांच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. मिरची व टोमॅटोचे दरही स्थिर राहिले. 

टोमॅटो व मिरचीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात फारसे नाही. जामनेरातील पहूर, पाळधी, शेंदूर्णी यासोबत तापी नदीच्या काठावरील जळगाव तालुक्‍यातील विदगाव, रिधूर आदी भागात तसेच काही प्रमाणात पाचोरा, एरंडोलात लागवड केली जाते. टोमॅटो, मिरचीची कमाल आवक ही सिल्लोड (जि. औरंगाबाद), धुळेलगतच्या भागातून होते. आवक गतसप्ताहातही फारशी वाढली नाही. त्यामुळे दर बऱ्यापैकी मिळाले. मिरचीची प्रतिदिन आवक १७ क्विंटल राहिली. हिरव्या मिरचीला ११०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. टोमॅटोची आवक प्रतिदिन सात क्विंटल राहिली. त्यास १८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

भरीताच्या वाग्यांची प्रतिदिन आवक २२ क्विंटल नोंदविली गेली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये दर मिळाला. मेथीची आवक वाढली. प्रतिदिन सात क्विंटल आवक नोंदविली असून, तिला प्रतिजुडी चार रुपये दर मिळाला. कांद्याची प्रतिदिन २८० क्विंटल आवक नोंदविली. त्यास १२०० ते ४००० व सरासरी ३००० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बटाट्याची आवक प्रतिदिन २०० क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १६०० रुपये दर होता.

कारल्याची आवकही टिकून होती. प्रतिदिन चार क्विंटल आवक झाली. त्यास १४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गिलक्‍याची आवकही वाढली आहे. प्रतिदिन पाच क्विंटलपर्यंत आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. पालक, पोकळा यांची आवक कमी होती. पालकही प्रतिदिन दोन क्विंटल आवक राहिली. तीस एकच ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. पोकळ्याची आवक प्रतिदिन अडीच क्विंटल राहिली. त्याला प्रतिक्विंटल १२०० रुपये दर मिळाला. 

उडीद आवक किरकोळ
उडदाची प्रतिदिन ८० क्विंटल आवक नोंदविली गेली. त्यास प्रतिक्विंटल ३८०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. मुगाची आवकही प्रतिदिन १२५ क्विंटल राहिली. त्यास ३८०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. सोयाबीनची आवक प्रतिदिन ५०० क्विंटल राहिली. सोयाबीनला २००० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला. 

केळी दर स्थिर
कांदेबाग केळीला प्रतिक्विंटल ९५० रुपये दर होता. जुनारीला ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीचे दर स्थिर होते. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढल्याने केळीच्या मागणीत काहीशी वाढ नोंदविली गेल्याचे रावेर (जि. जळगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीने म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...