agriculture news in marathi article regarding return mansoon | Agrowon

परतीच्या मॉन्सूनला लवकरच सुरवात
डॉ. रामचंद्र साबळे
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

ओदिशाच्या उत्तरेस व दक्षिणेस हवेचे दाब कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. ईशान्य भारतावरही १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. राजस्थानच्या उत्तरेकडील भागावर हवेचा दाब वाढून तो १०१० हेप्टापास्कल इतका होईल आणि तेथे पाऊस थांबेल, हे चिन्ह परतीचा मान्सून सुरू होण्याचे संकेत देत आहे.

ओदिशाच्या उत्तरेस व दक्षिणेस हवेचे दाब कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. ईशान्य भारतावरही १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. राजस्थानच्या उत्तरेकडील भागावर हवेचा दाब वाढून तो १०१० हेप्टापास्कल इतका होईल आणि तेथे पाऊस थांबेल, हे चिन्ह परतीचा मान्सून सुरू होण्याचे संकेत देत आहे.

महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१० हेप्टापास्कल इतका अधिक राहील. त्यामुळे या सर्व भागात पावसात उघडीप राहील. संपूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम या भागावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे तेथेही पाऊस थांबेल. मात्र ओदिशाच्या उत्तरेस व दक्षिणेस हवेचे दाब कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. ईशान्य भारतावरही १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. राजस्थानच्या उत्तरेकडील भागावर हवेचा दाब वाढून तो १०१० हेप्टापास्कल इतका होईल आणि तेथे पाऊस थांबेल, हे चिन्ह परतीचा मान्सून सुरू होण्याचे संकेत देत आहे.
     पश्‍चिम महाराष्ट्रावर १०१० तर पूर्व महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब १६ सप्टेंबर रोजी राहील. त्या वेळी महाराष्ट्राचे पूर्व भागात अल्पसा पाऊस सुरू होण्यास वातावरण अनुकूल बनले. मात्र हिमालयाच्या पायथ्याशी हवेचे दाब कमी होण्यामुळे परतीच्या मॉन्सून पावसाला जोर राहणार नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात उघडीप आणि पूर्व भागात पाऊस सुरू होईल. या आठवड्यात महाराष्ट्रातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता आहे.

कोकण  
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी ८ मिलिमीटर तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत काही दिवशी ४ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण कोकणात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ किलोमीटर राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील व ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्र
नाशिक व जळगाव जिल्ह्यांत काही दिवशी ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत काही दिवशी ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २० अंश आणि जळगाव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मराठवाडा
लातूर व नांदेड जिल्ह्यांत काही दिवशी ८ ते ९ मिलिमीटर तर औरंगाबाद जिल्ह्यात ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत काही दिवशी ३ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. मराठवाड्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत १५ किलोमीटर राहील. हिंगोली जिल्ह्यात १४ किलोमीटर राहील. नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत ताशी १२ किलोमीटर आणि औरंगाबाद जिल्ह्यात ताशी ११ किलोमीटर राहील. कमाल तापमान जालना व बीड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील; नांदेड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ते ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व जालना जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान २० अंश सेल्सिअस आणि हिंगोली जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पश्‍चिम विदर्भ
वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्‍यता लगेच नाही. मात्र बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५५ टक्के राहील. मध्य विदर्भ, यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत काही दिवशी ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ
पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही दिवशी ३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

दक्षिण - पश्‍चिम महाराष्ट्र
पुणे जिल्ह्याचे पूर्व भागात काही दिवशी ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सातारा व नगर जिल्ह्यांचे पूर्व भागात ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत काही दिवशी ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात अत्यल्प १ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात १५ किलोमीटर राहील व नगर जिल्ह्यात ताशी ११ किलोमीटर राहील. सांगली व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ किलोमीटर राहील. तर कोल्हापूर जिल्ह्यात ताशी ६ किलोमीटर राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. सांगली व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व सातारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस आणि पुणे जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस तर सांगली व सातारा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...