agriculture news in marathi, Artificial sandstorm facility in 110 villages in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम रेतनाची सुविधा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची पैदास व्हावी, यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत ३४ कृत्रिम रेतन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून ११० गावांत ही सुविधा मिळणार आहे. ज्या भागात पशुसंवर्धन विभाग पोचू शकत नाहीत त्या दुर्गम भागात बाएफचे कर्मचारी जाऊन कृत्रिम रेतन करणार आहेत. यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रतीच्या जनावरे निर्मितीला चालना मिळणार आहे.

कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची पैदास व्हावी, यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत ३४ कृत्रिम रेतन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून ११० गावांत ही सुविधा मिळणार आहे. ज्या भागात पशुसंवर्धन विभाग पोचू शकत नाहीत त्या दुर्गम भागात बाएफचे कर्मचारी जाऊन कृत्रिम रेतन करणार आहेत. यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रतीच्या जनावरे निर्मितीला चालना मिळणार आहे.

पशुसंवर्धन विभागात तोकडे मनुष्यबळ आणि दवाखान्यांची संख्या मर्यादित असल्याने जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी कृत्रिम रेतन पद्धती एक तर सहकारी संघांच्या मार्फत राबविली जाते किंवा खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत महागडी सुविधा घ्यावी लागते. दुर्गम भागापर्यंत पशुसवंर्धन विभागाचे कर्मचारी पोचू शकत नाहीत. त्यांना मर्यादा येते. सहकारी संघाचे अधिकारी संघाला दूधपुरवठा करणाऱ्या सभासदांनाच प्राधान्य देतात. यामुळे अनेकदा रेतनासाठी पशुपालकांना फिरावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी शासन व बाएफ संस्था एकत्र येऊन हा प्रकल्प राबवत आहेत.

आकडेवारी समजणार
कृत्रिम रेतन केल्यानंतर वासराचा जन्म होइपर्यंत हे कर्मचारी संबंधित पशुपालकाच्या संपर्कात रहातील. यामुळे बाएफच्या माध्यमातून किती जनावरांची व कोणत्या जातीची पैदास झाली हे समजू शकणार आहे. कृत्रिम रेतन यशस्वी झाल्यानंतर बाएफला शासनाकडून मोबदला दिला जाईल. घरोघरी जावून हे कर्मचारी सेवा देणार असल्याने याचा फायदा दुर्गम भागातील पशुपालकांना होऊ शकेल.

असा आहे प्रकल्प
दहा तालुक्‍यांमध्ये बाएफची ३४ सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये एक एरिया ऑफिसरची नियुक्ती केली जाईल. ३४ सेवा केंद्राच्या नियंत्रणाखाली ११० गावांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. शासकीय दरात पशुपालकांना कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी या गावांमध्ये बाएफचे कर्मचारी पशुपालकांच्या घरी जावून ही सेवा देतील. त्याची नोंद या कर्मचाऱ्यामार्फत ठेवण्यात येईल.

जिल्ह्यातील दुर्गम भागातही बाएफचे कर्मचारी जाऊन पशुपालकांना सेवा देणार आहेत. यामुळे शासनालाही जनावरांची किती पैदास झाली हे समजू शकेल. तसेच चांगल्या दर्जाचे पशुधनही उपलब्ध होऊ शकेल.
-संजय शिंदे,
 कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

बाएफच्या वतीने सूत्रबद्ध पद्धतीने आम्ही ही सेवा देणार आहोत. यासाठी केंद्रे, गावे व पुरेसे मनुुष्यबळ आम्ही सज्ज ठेवले आहे. घरपोच सेवा मिळणार असल्याने याचा फायदा पशुपालकांना होईल.
- डॉ. निशिकांत भनांगळे,
प्रकल्प अधिकारी, बाएफ

 

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...