कणेरी मठावर उद्यापासून कारागीर महाकुंभ मेळावा

कणेरी मेळावा
कणेरी मेळावा

कोल्हापूर : कणेरी (जि. कोल्हापूर) येथील सिद्धगिरी मठावर उद्यापासून (ता. ११) कारागीर महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे दोनशे कारागीर आपली कला या महोत्सवात सादर करणार आहेत. बारा बलुतेदारांच्या कला लुप्त होत आहेत. त्या पुनरुज्जीवित करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मठाचे प्रमुख श्री काडसिद्धेश्वर यांनी दिली. १५ तारखेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या अनुषंगाने सिद्धगिरी कणेरी मठ येथे कारागीर ज्ञानपीठ स्थापन होत आहे. या ज्ञानपीठाच्या माध्यमातून विविध शास्त्रशुद्ध व अद्ययावत कारागीर अभ्यासक्रम व प्रशिक्षण सुरू होणार आहे. या ज्ञानपीठाच्या उद्‌घाटनानिमित्त या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्या लुप्त होत असलेल्या कारागिरी यानिमित्ताने आधुनिक पद्धतीने कशा जोपासल्या जाणार आहेत, याचीच ही झलक असणार आहे. याबरोबर देशी गायींचे प्रदर्शन व खाद्य महोत्सव होईल.  गुजरातचे स्वामी नारायण संस्थेचे पूज्यपाद त्यागवल्लभ दास यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. या वेळी ग्रामीण अर्थवयवस्था केंद्रित विविध विषयांवरील परिसंवाद ही होतील. मठावर या साठी विशव कर्मा नगर या नावाने एक छोटेखानी नगरच वसवण्यात आले आहे. या ठिकाणी हे कार्यक्रम होतील. या कारागीर सोहळ्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांची वैशिष्ट्ये

  • वीणकामाचे नाजूक कलाकुसर करणारे कारागीर, 
  • कर्नाटक राज्यातील स्फटिकात मूर्ती तयार करणारे कारागीर, 
  • दिमडीपासून ढोल-ताशापर्यंत, पखाली, मोट अशा चामड्याच्या वस्तू तयार करणारे चर्मकार, 
  • तांबे, पितळ आणि कास्याची भांडी व इतर वस्तू बनविणारे कारागीर, 
  • पामच्या पानापासून विविध वस्तू तयार करणारे कारागीर नारळाच्या पानापासून फुले-चटई- भिंतीवर टांगावयाच्या शोभेच्या वस्तू तयार करणारे अवलिये कारागीर, 
  • नारळाच्या पानापासून बुट्ट्या आणि टोप्या तयार करणारे कारागीर, 
  • मातीची विविध प्रकारची भांडी क्षणात तुमच्यासमोर तयार करून देणारे कुंभार कारागीर, 
  • देशाची खेळण्यांची राजधानी अशी ओळख असलेल्या चेन्नापटना, 
  • म्हैसूर येथील कलाकार २०० पेक्षा जास्त लाकडी खेळण्यांचा खजिना बालचमूंसाठी घेऊन येणार आहेत, 
  • जनावरांच्या शेणापासून तोरण, घड्याळ, बाहुल्या तयार करणारे कारागीर, 
  • केळीच्या बुंध्यापासून विविध शोभेच्या वस्तू व वापरावयाच्या वस्तूंचे प्रदर्शन व कारागिरी, 
  • शंख-शिंपल्यापासून शोभेच्या हजारो वस्तू तयार करणारे कारागीर, 
  • गोधडीपासून तयार केलेले जॅकेट, ओढणी, उपरणे, टेबलक्लॅथ अनेकविध वस्तू.
  • गो प्रदर्शनात पाहायला मिळणार.. बारा लिटर दूध देणारी देशी खिल्लार गाय, पंधरा लाखांचा खिल्लार वळू – चॅंपियन खिल्लार, अडीच टनाचा गीरचा नंदी – भारतातील सर्वांत मोठा गीरचा नंदी, भारतातील २२ प्रजातींचे गोवंश पाहण्याची संधी, आज्ञाधारी गायी व आज्ञाधारी बैलांच्या कसरती पाहण्यास मिळणार आहेत.  खाद्य महोत्सवची वैशिष्ट्ये पुथरेकू - तांदळाच्या कागदापासून बनवण्यात येणारी अनोखी मिठाई, १२० प्रकारचे डोसे तयार करून देणारा हैदराबादचा अवलिया, खानदेशी मांडे, पाच प्रकारच्या भाकरी, २५ प्रकारच्या चटण्या, राजस्थानमधील ५० प्रकारची लोणची उपलब्ध असेल.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com