बोंड अळीला शासन, बियाणे कंपन्याच जबाबदार : अरुण गुजराथी

अरुण गुजराथी
अरुण गुजराथी

जळगाव ः कपाशीचे बॅसीलस थुरीलेंझीस (बीटी) बियाणे बोलगार्ड (बीजी) दोन प्रकारच्या तंत्रज्ञानातून तयार केलेले असताना त्यावर गुलाबी बोंडअळी आली. हा प्रकार गंभीर असून, यासंबंधीची पूर्णतः जबाबदारी शासन व संबंधित कापूस बियाणे उत्पादक कंपन्या यांची असल्याचा दावा विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आघाडीचे जीनिंग व्यावसायिक अरुण गुजराथी यांनी बुधवारी सायंकाळी (ता.१३) जळगावात झालेल्या जिनर्स, कृषी विभागाच्या संयुक्त बैठकीत मांडले.  बैठकीला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह खते वितरक, बियाणे उत्पादक कंपन्यांचे काही प्रतिनिधी खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, सचिव लक्ष्मण पाटील, आत्माचे संचालक शिवाजी आमले, वरिष्ठ कृषी विद्याशास्त्रज्ञ बी. डी. जडे, विशाल राजेभोसले, सुभाष थेटे आदी उपस्थित होते.  अरुण गुजराथी म्हणाले, १०-१२ वर्षांनंतर कपाशीवर गुलाबी बोंडअळी मोठ्या प्रमाणात आली. त्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. शासन व बियाणे उत्पादक कंपन्या यांची प्रमुख जबाबदारी यात आहे. गुलाबी बोंड अळी नष्ट झाली नाही तर मोठे संकट उभे राहील. तिचा नायनाट झाला तरच शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. आगामी हंगामात १० हजार कापूस उत्पादकांना मोफत कामगंध सापळे देणार असल्याचे या बैठकीत दोन बियाणे कंपन्यांनी सांगितले. तसेच कपाशीचे पीक लवकर नष्ट करा. एकात्मिक उपाय योजना राबवायला सुरवात केली जाईल, असे आत्माचे संचालक आमले म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com