agriculture news in Marathi, Ashadi celebrate in solapur today, Maharashtra | Agrowon

आज आषाढी एकादशी
सुदर्शन सुतार
सोमवार, 23 जुलै 2018

पंढरपूर : 
त्रिविध तापांची झाली बोळवण ।
देखील्या चरण वैष्णवांचे ।।
एका जनार्दनी घडो त्याचा संग ।
न व्हावा वियोग जन्मोजन्मी ।।

अशी आर्त भावना मनात ठेवून आषाढी सोहळ्यात सहभागासाठी राज्यभरातून सुमारे सहा लाखाहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी रविवारी (ता.२२) पंढरीत दाखल झाली.

या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने रविवारी पहाटेपासूनच चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तिरसात न्हाऊन गेली. 

पंढरपूर : 
त्रिविध तापांची झाली बोळवण ।
देखील्या चरण वैष्णवांचे ।।
एका जनार्दनी घडो त्याचा संग ।
न व्हावा वियोग जन्मोजन्मी ।।

अशी आर्त भावना मनात ठेवून आषाढी सोहळ्यात सहभागासाठी राज्यभरातून सुमारे सहा लाखाहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी रविवारी (ता.२२) पंढरीत दाखल झाली.

या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने रविवारी पहाटेपासूनच चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तिरसात न्हाऊन गेली. 

दरम्यान, सोमवारी (ता.२३) आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत असून, पहाटे श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.  राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातूनही लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागासाठी राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्यांनीही आज पंढरपुरात प्रवेश केला. त्याशिवाय दर काही मिनिटाला एस. टी. बसेस, खासगी गाड्या आणि रेल्वेने वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने चोहोबाजूने भक्तिरसाचा प्रवाह पंढरीत एक होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चंद्रभागा वाळवंट आणि शहरातील विविध मठ, धर्मशाळांमध्ये "टाळ, मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जयघोष सुरू आहे.

रविवारी वाखरी (ता. पंढरपूर) येथून निघालेल्या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह विविध संतांच्या पालख्यांनी पंढरपुरात प्रवेश केला. शहरातील मठ, धर्मशाळा आदी ठिकाणांसह चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या राहुट्यांमधून भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत. चंद्रभागेतील स्नानासाठी लाखो भाविकांची चंद्रभागेतीरी झुंबड उडाली आहे. विठ्ठल पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपुराच्या पुढे गेली आहे. दर्शनरांगेत जवळपास दीड लाखाहून अधिक वारकरी दर्शनासाठी उभे आहेत. क्षणोक्षणी वारकऱ्यांची गर्दी वाढतेच आहे.

शासकीय महापूजेला मुख्यमंत्री येणार नाहीत
परंपरेप्रमाणे आषाढी वारीतील मुख्य शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक होते. परंतु यंदा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरून जिल्ह्यातील विविध भागात आंदोलने सुरू केले आहे. तसेच ही महापूजा रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपण या महापूजेला येणार नसल्याचे जाहीर केल्याने यंदा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांविना हा सोहळा पार पडणार आहे. 

पंढरीतील क्षणचित्रे 

  • चंद्रभागेवर दशमीच्या स्नानासाठी वारकऱ्यांची गर्दी.
  • विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपुरापर्यंत 
  • दर्शनरांगेत दीड लाखाहून अधिक वारकरी.
  • दर्शनरांगेतून दर्शनासाठी २० तासांचा अवधी 
  • प्रतिमिनिटाला ३५ ते ४० वारकऱ्यांना दर्शन.
  • विविध मंदिरे, मठ, धर्मशाळात कीर्तन, भजनाचे सूर  

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....