आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दांपत्याला 

आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दांपत्याला 
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दांपत्याला 

सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय महापुजा करण्याचा मान यंदा अनिल गंगाधर जाधव (वय ३७)  आणि  वर्षा अनिल जाधव ( वय ३५)  या दांपत्याला मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील भगवंती कडोळी ( ता. शेणगाव) येथील हे वारकरी दाम्पत्य आहे. 

गेल्या चार वर्षापासून हे दांपत्य पायी वारी करतात. दहावी पर्यंतचे शिक्षण झालेल्या या दांपत्याला मुलगा आणि दोन मुली असून विठ्ठलाची वारी ते दरवर्षी मुलाला वा मुलीला घेउन करतात. यंदाचे मानाचे वारकरी दरवर्षी पेक्षा अधिक भाग्यवान आहेत. कारण दरवर्षी मानाच्या वारकऱ्यांना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळत असला तरी प्रत्यक्ष पूजेचे सर्व विधी मुख्यमंत्री व त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते होत असते. मात्र यंदा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पूजेपासून रोखल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूजेला येणार नसल्याचे जाहीर केले, पण ही पूजा वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येइल,अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली. त्यामुळे यंदा या वारकरी दाम्पत्याला हा मान मिळाला.  

असा ठरतो मानाचा वारकरी शासकीय पूजा सुरु होण्याच्या आधीच दर्शन मंडपाचे मुख्य प्रवेश व्दार बंद केले जाते. मंडपातून मंदिरात येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये जे माळकरी आहेत. ज्यांच्या घरात वारीची परंपरा आहे. जे सहकुटुंब पायी वारी करतात अशा वारकऱ्यांस हा मान मिळतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com