agriculture news in marathi, Ashok Chavan critises State BJP Government, Mahad | Agrowon

अपयशी सरकारला ‘चले जाव’ करण्याची हीच वेळ
वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

महाड, जि. रायगड : गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सत्तेत बसलेल्या लोकांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे तर सोडाच, प्रश्नही माहित नाहीत. या सरकारला ‘चले जाव’ सांगण्याची हीच वेळ आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली.

महाड, जि. रायगड : गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सत्तेत बसलेल्या लोकांना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे तर सोडाच, प्रश्नही माहित नाहीत. या सरकारला ‘चले जाव’ सांगण्याची हीच वेळ आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली.

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जनआक्रोश सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहातील दुसऱ्या जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन महाड येथे शनिवारी (ता. ४) करण्यात आले होते. या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, नसीम खान, खासदार हुसेन दलवाई, गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप, हुस्नबानो खलिफे, प्रवक्ते सचिन सावंत, अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

चव्हाणम्हणाले, ‘‘राज्यातील १२ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तरी सरकारला लाज वाटत नाही. सरकारची कर्जमाफी फसवी आहे. कर्जमाफीतून मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून कोकणावर अन्याय केला आहे. राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांनी देणे घेणे नाही. जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने सुरू केलेला संघर्ष या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही.’’

‘जगणे महाग, मरणे स्वस्त’
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले, अशी टीका महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी शक्तींच्या इशाऱ्यावर देश चालवत असून गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्यांनी कररूपाने दिलेले साडेसहा लाख कोटी रुपये आपल्या उद्योगपती मित्रांना वाटले. शाह आणि तानाशाहांची जोडी देशाला लुटण्याचे काम करीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

‘शेतीमालाला हमीभाव नाही’
भाजप सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असून निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन या सरकारने पाळले नाही. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुठलाही वर्ग सरकारच्या धोरणांवर समाधानी नाही. परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....