agriculture news in Marathi, Ashok chavan says gave immediate help to farmers, Maharashtra | Agrowon

गारपीटग्रस्तांना घोषणा नको, तत्काळ मदत द्यावी ः अशोक चव्हाण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पूर्णा, जि. परभणी : गारपीटग्रस्तांना मदत देण्याची केवळ घोषणा करून उपयोग नाही. या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १३) केली.

पूर्णा, जि. परभणी : गारपीटग्रस्तांना मदत देण्याची केवळ घोषणा करून उपयोग नाही. या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १३) केली.

खासदार चव्हाण यांनी पूर्णा तालुक्यातील चुडावा आणि नऱ्हापूर या गावांच्या शिवारात सोमवारी (ता. १२) दुपारी वादळी वारे, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नुसत्या घोषणा करत आहे. परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र समाधानकारक नाही. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सोबतच कर्जमाफीदेखील देणे आवश्यक आहे. 

या वेळी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, डी. पी. सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे आदींसह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरम्यान, श्री. चव्हाण यांनी सोमवारी गारपिटीत सापडून मृत्यू झालेल्या भगीरथीबाई पांडुरंग कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...