agriculture news in marathi, Ashok gulati says, remove all restrictions from market, Maharashtra | Agrowon

बाजारपेठेवरील सर्व बंधने हटवा : अशोक गुलाटी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पुणे : भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी मांडलेली मुक्त बाजारपेठेची संकल्पना परिवर्तनकारी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारला शेतकऱ्यांची दुरवस्था संपविण्याची इच्छा असल्यास शेतमाल बाजारातील सर्व बंधने काढून टाकावीत, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी केले. 

पुणे : भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी मांडलेली मुक्त बाजारपेठेची संकल्पना परिवर्तनकारी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारला शेतकऱ्यांची दुरवस्था संपविण्याची इच्छा असल्यास शेतमाल बाजारातील सर्व बंधने काढून टाकावीत, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी केले. 

पुण्यातील गोखले इन्‍स्‍टिट्यूट आणि शेतकरी संघटना ट्रस्टच्या वतीने आयोजिलेल्या शरद जोशी स्मृति व्याख्यानमालेत ‘‘शेतकऱ्यांच्या मदतीचे उत्तम मार्ग" या विषयावर ते बोलत होते. या वेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी संघटना ट्रस्टचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, प्रा. राजस परचुरे, कृषी अर्थतज्‍ज्ञ डॉ.प्रदीप आपटे व इतर मान्यवर उपस्थित होते. 
शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असल्यास शरद जोशी यांनी मुक्त बाजारव्यवस्था आणि तंत्रज्ञानाचा अवलंब या दोन तत्वांचा नारा दिला होता. त्यांनी काही दशकांपूर्वी धरलेला या दोन्ही संकल्पना आजही उपयुक्तच नव्हे तर त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, असे सांगून श्री. गुलाटी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे मार्ग आणि नवे तंत्रज्ञान बंद असल्यास देशाच्या कृषी उत्पादनात वाढ करणे धोक्याचे आहे.

‘‘देशात स्वदेशी वाणांची लागवड होत असताना अन्नधान्याची टंचाई होती. विदेशी वाणांची आयात करून उत्पादन वाढविण्यास तत्कालीन राजवटींमध्ये विरोध झाला होता. मात्र, शरद जोशी स्वतः नव्या कृषी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही होते. नवे तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. 

भारत हा जगाच्या पाठीवरचा गरीब ग्राहक वर्ग असलेला आणि उत्पादक शेतकरी वर्ग असलेला सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे सरकारला ग्राहक आणि उत्पादक या दोन्ही वर्गासाठी विविध धोरणे ठरविताना विचित्र कसरत करावी लागते. त्यातून शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या धोरणांचीच आखणी बहुतेक वेळा होते. सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उपयुक्त धोरणांचा स्वीकार न केल्यास शेतकरी वर्गाच्या समस्या आणखी वाढतील, असा इशारा श्री. गुलाटी यांनी दिला.

पाशा पटेल यांनी  पंतप्रधानांना सांगावे
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून अनेक सल्ले केंद्र सरकारला दिले जातात. त्यांच्या व्हॉटसअपवरील डीपीमध्ये एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात श्री. पटेल हे काही तरी सांगत असल्याचे दिसते आहे. त्यांनी काय सांगितले हे कळलेले नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा आणि तंत्रज्ञानावरील बंधने आता हटवा, असे देखील पाशा पटेल यांनी आता पंतप्रधानांच्या कानात सांगण्याची गरज आहे, असे उद्गगार अशोक गुलाटी यांनी आपल्या भाषणात काढले.

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...