अश्वगंधा
अश्वगंधा

करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखी

गडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत नंतर शेतकरी आणि कृषी विभागाची एका कंपनीने चांगलीच दमछाक केल्याचा धक्‍कादायक प्रकार दुर्गम आणि आदिवासीप्रवण गडचिरोली जिल्ह्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे नागपुरातील या कंपनीने शेतकऱ्यांना चुकाऱ्यापोटी दिलेले चेकही पैशाअभावी बॅंकेत अनादरीत झाले. त्यामुळे औषधी वनस्पती आणि खरेदी संदर्भाने होणाऱ्या करारात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गडचिरोली हा भात उत्पादक जिल्हा या जिल्ह्यात व्यावसायिक पीकपध्दतीला चालना मिळावी, याकरिता कृषी विभागाने पुढाकार घेत औषधी वनस्पती लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. चामोर्शी आणि गडचिरोली तालुक्‍यांत अश्‍वगंधा लागवडीचे त्यानुसार ठरले. लागवडीपूर्वी खरेदीदारांचा शोध सुरू झाला. पुण्या-मुंबईतील खरेदीदार गडचिरोलीत काम करण्यास तयार नसल्याने कृषी विभागाच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे त्यांनी विदर्भातीलच खरेदीदारांचा शोध सुरू केला. नागपुरातील एक कंपनी त्यानुसार तयार झाली. ९० एकर अश्‍वगंधा लागवड कंपनीच्या सहमतीनेच त्यानंतर झाली. १२० रुपये किलोचा दर कंपनीने देण्याचे मान्य केले.  परंतु, अश्‍वगंधा उत्पादनानंतर मात्र कंपनीकडून खरेदीस टाळाटाळ करण्यात आली. कृषी विभागाकडून पाठपुरावा करण्यात आल्यानंतर कंपनी खरेदीला तयार झाली. खरेदी नंतर पुन्हा पैशासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी नंतर कृषी विभागाची चांगलीच दमछाक झाली. काही शेतकऱ्यांना कंपनीने दिलेले चेक अनादरीत झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. कंपनीकडून कसेबसे पैसे मिळवून दिल्यानंतर आता अशाप्रकारच्या कंपन्यांशी करार न करण्याची भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com