Agriculture news in marathi; Atal Anandvan Scheme in maharastra | Agrowon

राज्यात लवकरच अटल आनंदवन योजना ःमुनगंटीवार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक असून, त्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वन आंदोलन आणि वृक्ष सत्याग्रहाचे स्वरूप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे. जपानमधील मियावाकी जंगलाच्या धर्तीवर प्राणवायूची शाश्वत ठिकाणे निर्माण करण्यासाठी नगरपालिका, महापालिका यांच्या धर्तीवर अटल आनंदवन योजना आणली जाणार आहे. एक एकरात १० ते १२ हजार झाडे लावून ती जगवून या माध्यमातून १३ टक्के वन आच्छादित क्षेत्र वाढविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक असून, त्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वन आंदोलन आणि वृक्ष सत्याग्रहाचे स्वरूप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे. जपानमधील मियावाकी जंगलाच्या धर्तीवर प्राणवायूची शाश्वत ठिकाणे निर्माण करण्यासाठी नगरपालिका, महापालिका यांच्या धर्तीवर अटल आनंदवन योजना आणली जाणार आहे. एक एकरात १० ते १२ हजार झाडे लावून ती जगवून या माध्यमातून १३ टक्के वन आच्छादित क्षेत्र वाढविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

म. वि. प्र. संस्थेच्या वाणिज्य, व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयात ३३ कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त राजाराम माने, महापौर रंजना भानसी, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी. के. चौबे, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ए. के. कळसकर, पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षसंवर्धनासाठी पुढील दहा वर्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बिजारोपण होण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा. रानमळा पद्धत, कन्या वनसमृद्धी योजना हे उपक्रम याच प्रयत्नांचा भाग असून, त्याबाबत जनतेला अधिकाधिक माहिती देण्यात यावी. वन विभागातर्फे १२ हजार ६६५ गावांत संयुक्त वन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीची सांगड आर्थिक आणि सामाजिक विकासाशी घालून त्याला लोकचळवळीचे रूप देण्याचा प्रयत्न असून, जनतेने यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले.

विभागीय आयुक्त माने यांनी ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत विभागातील पूर्वतयारीची माहिती दिली. नाशिक विभागात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ५ कोटी ८२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ६ कोटी ८५ रोपे उपलब्ध आहेत. ५ कोटी ४ लक्ष खड्डे खोदण्यात आले आहेत. हरितसेनेअंतर्गत ७ लाख ९५ हजार नोंदणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. या वेळी पोपटराव पवार यांनी मधमाश्‍या आकर्षित करणाऱ्या आणि पक्ष्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त प्रजातीची झाडे लावण्याचे आवाहन केले.

नाशिक विभागातील वृक्ष लागवडीची आखणी 

  •  धुळे ‍जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वन विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड 
  •  जळगाव जिल्ह्यात रोटरी क्लब आणि जैन इरिगेशनच्या माध्यमातून त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्ष लागवड 
  •  नंदुरबार जिल्ह्यातील कोठली खुर्द गावात सघन वृक्ष लागवड; त्यासाठी २२ गावांत स्वयंसेवी संस्थांची मदत
  •  नाशिक जिल्ह्यात देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपणाला चांगला प्रतिसाद 
  •  अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी साखर कारखान्यांची मदत

इतर बातम्या
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...