शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानावर अथांग जैन यांनी मांडल्या संकल्पना
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

अथांग जैन यांनी या परिषदेत ‘नवीन भारत ः २०२२’ या विषयांतर्गत शेतीतील बदलते तंत्रज्ञान व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करायचे प्रयत्न या संकल्पनेवर आपले मुद्दे मांडले. 

जळगाव : भारत देश २०२२ मध्ये कसा असावा यासंदर्भात दिल्ली येथे निती आयोगातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशातील २०० तरुण उद्योजकांसाठी चॅंपियन ऑफ चेंज ही परिषद नुकतीच घेण्यात आली. या परिषदेत जळगाव येथील जैन फार्मफ्रेश फुड्‌स लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. अथांग जैन यांनी या परिषदेत ‘नवीन भारत ः २०२२’ या विषयांतर्गत शेतीतील बदलते तंत्रज्ञान व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करायचे प्रयत्न या संकल्पनेवर आपले मुद्दे मांडले. 

त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चाही केली. या परिषदेत सॉफ्ट पॉवर, इनक्रेडिबल इंडिया, शिक्षण मनुष्यबळ विकास, आरोग्य, डिजिटल इंडिया आदी विषयांचा समावेश २०२२ मधील नवीन भारत या संकल्पनेत केला होता. जे उद्योजक व व्यावसायिक भारतात उद्योजकीय बदल, प्रगती घडवू शकतील, अशा तरुण उद्योजकांची निवड करण्याची जबाबदारी निती आयोगावर सोपविली होती. या अंतर्गत अथांग जैन यांची निवड झाली. 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चॅंपियन ऑफ चेंजमध्ये सहभागी तरुण उद्योजकांना संबोधित केले. या परिषदेत अथांग जैन यांनी शेतीत बदल घडवून गरिबीचे निर्मूलन कसे करता येईल? शेतीसंबंधीच्या उत्पादकांचे मूल्यवर्धन करून उत्पन्न वाढेल, शेतकऱ्यांना लाभ होईल, यासंदर्भातील आपल्या संकल्पना मांडल्या.

अथांग जैन हे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांचे पुतणे व अनिल जैन यांचे पुत्र आहेत. अथांग हे पद्मश्री भवरलाल जैन यांचे नातू असून, ते भवरलाल जैन यांचे विचार पुढे नेत आहेत. अथांग जैन यांनी तारुण्यातच राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परिषदेत सहभागी होऊन ध्येयधोरणांसंबंधी मुद्दे मांडले. 

इतर अॅग्रो विशेष
जिरायती भागात वेळेवर करा पेरणी जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण...
ठिबक अनुदानासाठी चुकीचे अर्ज रद्द होणार पुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन...
थेट भाजीपाला विक्रीतून साधली आर्थिक...करंज (जि. जळगाव) येथील सपकाळे कुटुंबीय गेल्या आठ...
ज्वारी पीक संरक्षण किडींचा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून...
शेतीमध्ये मीठ-क्षारांच्या वापराचे...मीठ (क्षार) हे खनिज असून, त्याच्या वापराने...
मांडव पद्धतीने पिकतोय सर्वोत्कृष्ट...अपघातामुळे अपंगत्व आले म्हणून खचले नाहीत. उलट...
उत्तर प्रदेशसह बिहारमधील साखर उत्पादन... नवी दिल्ली ः उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्ये...
कृषी सहायकांनी सोडला अतिरिक्त पदभार अकोला ः रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात...
तेलबिया महामंडळाची जमीन विक्रीलामुंबई : बंद पडलेल्या महाराष्ट्र राज्य तेलबिया...
नऊ वर्षांनंतर उघडले जायकवाडीचे दरवाजेजायकवाडी, जि. औरंगाबाद ः जायकवाडी प्रकल्पात अचानक...
योग्य वेळेत करा रब्बी पिकांची पेरणी रब्बी पिकांची जिरायती आणि बागायती क्षेत्रात योग्य...
कर्जमाफीची माहिती देण्यात बँका उदासीनमुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी...
जायकवाडी भरले, गोदावरीत पाणी सोडले...पैठण, जि. औरंगाबाद : जायकवाडी(नाथसागर) धरणात...
जातिवंत बैल, गावरान म्हशींसाठी प्रसिद्ध...गावरान जनावरे, दुधाळ म्हशी तसेच शेळ्यांसाठी...
विदर्भात शेतकरी उत्पन्नवाढीसाठी...नागपूर ः आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांचे...
खडकाळ जमिनीतही पिकवला दर्जेदार पेरूशेतीच्या ओढीने स्वेच्छा निवृत्ती घेऊन नंदकुमार...
पणन मंडळाचीही हाेणार निवडणूकपुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचीदेखील...
​ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो....
गटशेतीला २०० कोटी देण्यासाठी नवे धोरणपुणे : राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी २००...
पावसाच्या स्थितीनुसार करा द्राक्ष छाटणीसर्व द्राक्ष विभागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस...