'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर पाडले'

गेल्या वर्षी १५ जानेवारीला १४० रुपये निर्यातक्षम डिळिंबाचा दर होता. आता व्यापाऱ्यांनी संगनमत करून तो ८० रुपयांवर आणला आहे. निर्यातक्षम डाळिंब उत्पादकांची राजरोस लूट सुरू आहे. - जितेंद्र गिड्डे, शेतकरी तडवळे
आटपाडीत निर्यातक्षम डाळिंबाचे दर पाडले
आटपाडीत निर्यातक्षम डाळिंबाचे दर पाडले

आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात निर्यातक्षर्म डाळिंब तयार झाली आहेत. मात्र संख्यने मोजक्‍या असलेल्या निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करून दर ५० टक्‍क्‍यांनी कमी केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दर पन्नास रुपये कमी आहेत. निर्यातदार व्यापारी डाळिंब उत्पादकांना राजरोस लुटत आहेत. या प्रकारामुळे डाळिंब उत्पादकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

आटपाडी तालुका दर्जेदार डाळिंब उत्पादन निर्मितीत आघाडीवर आहे. स्थानिक बाजारपेठेत चालणाऱ्या डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे डाळिंबाचे क्षेत्र, उत्पादनही वाढत गेले. त्यामुळे दर कोसळले. चार वर्षात डाळिंब दरात २० ते ४० टक्के घट झाली. त्यावर शेतकऱ्यांनी हिरो युरोप एक्‍सपोर्ट डाळिंबाचा उपाय शोधला. काही वर्षापासून मोजकेच शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेत होते. त्याला डिसेंबरमध्ये १२० रुपये दर मिळाला. तर जानेवारी आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये एकशे चाळीस ते साठ रुपये प्रति किलो दर मिळत होता. 

दरवर्षी या डाळिंबाचे भाव वाढत गेलेत. हंगामाचा शेवट उच्चांकी दराने होत होता. त्यामुळे युरोप डाळिंब निर्मितीकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली युरोप डाळिंबाचे उत्पादन घेण्यात अनेक जण यशस्वीही झाले. पूर्वी एक-दोनच निर्यातदार व्यापारी होते. उत्पादन वाढत गेले त्या तुलनेत त्यांचीही संख्या वाढत नाही. सध्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढे चार-पाच व्यापारी आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एक्‍स्पोर्ट माल सहजासहजी मिळत आहे. या व्यापाऱ्यांनी संगनमत करून एक्‍सपोर्टचे दर पाडलेत. 

या व्यापाऱ्यांना जिल्हा ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी जाब विचारला. मात्र हे व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यातूनच एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी एका व्यापाऱ्याला तालुक्‍यातून पळवून लावले. 

लोकल महाग, एक्‍स्पोर्ट स्वस्त या वर्षी हंगामाची सुरुवात प्रति किलो १२० रुपये दराने केली होती. त्यानंतर दर वाढत जातात, मात्र व्यापाऱ्यांनी संगनमत करून १०० आणि सध्या ८० रुपये प्रति किलोवर आणलीत. दुसरीकडे स्थानिक लोकल डाळिंबाचे भाव ४० रुपयांवरून साठ रुपयांवर पोचलेत. लोकलचे दर वाढत असताना एक्‍स्पोर्टचे मात्र व्यापाऱ्यांनी पाडलेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com