agriculture news in marathi, An attempt to bring the irrigation ratio to 40 percent ः karad | Agrowon

सिंचनाचे प्रमाण ४० टक्‍क्‍यांवर नेण्याचा प्रयत्न ः डॉ. कराड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद ः मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. आजघडीला मराठवाड्यात १७ ते १८ टक्के एवढेच असलेले सिंचनाचे प्रमाण किमान ४० टक्‍क्‍यांवर नेण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मत मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्‍त केले. सामूहिक गट शेतीवर भर देऊन शेतकऱ्यांना स्वतंत्र पॅकेज देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही डॉ. कराड यांनी या वेळी सांगितले.

औरंगाबाद ः मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. आजघडीला मराठवाड्यात १७ ते १८ टक्के एवढेच असलेले सिंचनाचे प्रमाण किमान ४० टक्‍क्‍यांवर नेण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मत मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्‍त केले. सामूहिक गट शेतीवर भर देऊन शेतकऱ्यांना स्वतंत्र पॅकेज देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही डॉ. कराड यांनी या वेळी सांगितले.

नऊ वर्षांनंतर डॉ. कराड यांच्या रूपाने मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाला अध्यक्ष लाभले आहेत. यापूर्वी तुळजापूरचे आमदार मधुकर चव्हाण हे महामंडळाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. तीन दिवसांपूर्वी नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी (ता. २५) डॉ. कराड यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड बोलत होते. डॉ. कराड यांनी पदभार घेतेवेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार प्रशांत बंब आदींची उपस्थिती होती.

डॉ. कराड म्हणाले, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवण्याचे आपले प्रयत्न राहतील. अध्यक्षपद स्वीकारण्यामागे मराठवाड्याचा अनुशेष दूर करणे हाच हेतू. त्यामुळे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आपण राजकारण विरहित ठेवू. इथे कुठल्याही प्रकारचे राजकारण होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेच जलसंधारण खाते असल्यामुळे राज्यासाठी दिलेल्या ४० हजार कोटींपैकी अधिकाधिक निधी मराठवाड्याला कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू. डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग, गुंतवणूक, औरंगाबाद, जालन्या प्रमाणेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकास, आरोग्य व वैद्यकीय सुविधा आणखी उत्तमरित्या पोचवण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याचा आपला प्रयत्न राहील.

औरंगाबाद शहराला मराठवाड्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा आहे. परंतु सुविधा अपेक्षित मिळत नाहीत. पर्यटकांसाठी विमानांची कनेक्‍टीव्हीटी या गोष्टी उपलब्ध नाहीत. भविष्यात पर्यटकांसाठी औरंगाबादेतून देशभरातील पर्यटनस्थळांना जोडणारी विमानसेवा उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. या शिवाय विभागाचा विकास आराखडा तयार करणे, कार्यन्वित योजनांचे पर्यवेक्षण, सनियंत्रण व मूल्यमापन, मंडळ कार्यालयांचे बळकटीकरण करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही डॉ. भागवत कराड यांनी या वेळी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...