पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे.
बातम्या
जळगाव : जिल्ह्यातील महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली असून, आपण केळी कटती प्रश्न आणि खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी अनागोंदी मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही सभापती लक्ष्मण पाटील यांनी दिली.
जळगाव : जिल्ह्यातील महत्त्वाच्या जळगाव बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली असून, आपण केळी कटती प्रश्न आणि खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी अनागोंदी मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही सभापती लक्ष्मण पाटील यांनी दिली.
अॅग्रोवनशी बोलताना श्री. पाटील म्हणाले, बाजार समितीत केळी फारशी विक्रीला येत नाही. अगदी दोन पाच क्विंटल येते. पण खासगी व्यापारी गावोगावी जाऊन केळी खरेदी करतात. त्यांच्यावर बाजार समिती नियंत्रण आणणार असून, त्यांना नोंदणी, परवाने बंधनकारक केले जाईल. ते केळीची पट्टी काट्यावर मोजणी करतात, पण यापुढे इलेक्ट्रॉनिक काटे बंधनकारक केले जातील.
बिगर परवानाधारक व्यापाऱ्यांविरोधात कारवाईसत्र हाती घेऊ. बाजार समितीचा महसूल भरणे त्यांना बंधनकारक राहील. जेथे केळी क्रेटमध्ये भरली जात असेल तेथे केळीचे वजन दांड्यासह धरण्याचे निर्देश जारी करू, कटतीचा प्रश्न हळूहळू मार्गी लावू, असे पाटील म्हणाले.
उत्पन्न वाढवू
बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी औद्योगिक वसाहतीत परस्पर होणारी घाऊक विक्री थांबवू. लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळावा यासाठी जिल्हाभरात शेतकऱ्यांना बाजार समितीमधील योजनांची, लिलाव प्रक्रियेची माहिती देऊ, तसेच अनावश्यक खर्च बंद करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकरी निवासाची दुरुस्ती
शेतकरी निवासची दुरुस्ती हाती घेणार असून, सध्या निवासामध्ये एक शासकीय कार्यालय व भाडेतत्त्वावर बॅंक सुरू आहे. शेतकरी निवासामध्ये शेतकऱ्यांना निवास करता येईल, अशा पद्धतीने दुरुस्ती करणार असून, शुद्ध पिण्याचे पाणी, बैलांना हाळ, चांगले रस्ते, आणि सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले.
- 1 of 567
- ››