agriculture news in marathi, Attempts to collect Sangli milk were defeated by 'Swabhimani' | Agrowon

सांगलीत दूध संकलनाचा प्रयत्न `स्वाभिमानी`ने हाणून पाडला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

सांगली ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुरू होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रात येऊन दूध जमा करत होते. संकलन केंद्रात जमा झालेले दूध प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालयात जाऊन वाटप करत होते. जिल्ह्यातील तेरा लाख लिटर दूध संकलन बंद राहिले आहे. भिलवडी परिसरात काही व्यावसायिकांनी दूध संकलनाचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

सांगली ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुरू होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रात येऊन दूध जमा करत होते. संकलन केंद्रात जमा झालेले दूध प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालयात जाऊन वाटप करत होते. जिल्ह्यातील तेरा लाख लिटर दूध संकलन बंद राहिले आहे. भिलवडी परिसरात काही व्यावसायिकांनी दूध संकलनाचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

जिल्ह्यात दूध संघ, संस्था व उत्पादक आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील १३ लाख ४० हजार लिटर दूध संकलन दुसऱ्या दिवशीही बंद राहिले. परिणामी जिल्ह्यात दुधाचाही महापूर आला. गावोगावी नद्यांना, ग्रामदेवता, पुतळ्यांना अभिषेक, शाळा-वसतिगृहांमध्ये मोफत दुधाचे वाटप करून शेतकऱ्यांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. आटपाडी तालुक्‍यातील झरे, आवळाई, आटपाडी, नेलकरंजी आदी भागात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध नोंदविला. उद्यापासून दुधाचे संकलन संघातर्फे सुरू राहणार असल्याने खऱ्या अर्थाने आंदोलन पेटणार, अशी चिन्हे आहेत. आंदोलनाचा भडका उडू नये म्हणून प्रशासन, पोलिस दलाने दक्षता घेतली आहे.

गनिमी काव्यावर पोलिसांची नजर
उत्पादकांनी दूध संस्थेला दूधच घालू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. त्यानुसार खासगी व्यवसायिकांनी मंगळवारी सर्व संघांनी दूध संकलन बंद ठेवले. मात्र, बुधवारपासून (ता. १८) बहुतांश दूध संघ संकलन करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पहिल्यांदा दूध संस्थेलाच दुधाचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी संघटनेचे कार्यकर्ते घेणार आहेत. त्यातूनही संस्थांना दूध गेले तर ते संस्थेतून संघाला जाणार नाही, यासाठी प्रयत्न होणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...