agriculture news in marathi, Attempts to increase the sowing of green gram in the state | Agrowon

राज्यात हरभऱ्याचा पेरा वाढविण्यासाठी प्रयत्न
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे : रबी हंगामात राज्यातील हरभरा क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना २१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरभरा उत्पादनात देशात मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणाचे एक प्रमुख उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्र यंदादेखील आघाडी घेण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षांत लागवडीची वाटचाल पाहिल्यास सरासरी क्षेत्र १३ लाख हेक्टर आहे. मात्र, गेल्या हंगामात राज्यात हरभऱ्याचा पेरा १८.५० लाख हेक्टरवर झाला. यंदा हाच पेरा १९ लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

पुणे : रबी हंगामात राज्यातील हरभरा क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना २१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरभरा उत्पादनात देशात मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणाचे एक प्रमुख उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्र यंदादेखील आघाडी घेण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षांत लागवडीची वाटचाल पाहिल्यास सरासरी क्षेत्र १३ लाख हेक्टर आहे. मात्र, गेल्या हंगामात राज्यात हरभऱ्याचा पेरा १८.५० लाख हेक्टरवर झाला. यंदा हाच पेरा १९ लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडापासूनच विविध भागांमध्ये हरभरा पेरण्यास सुरवात झाली आहे. डिसेंबरच्या पंधरवड्यापर्यंत पेरा चालू राहण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर तर बीड, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एक लाखाहून जास्त हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होण्याची शक्यता आहे.

राज्यभर चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा रबी हंगामात हरभरा पिकाच्या उत्पादनावर मुख्य भर देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यासाठी १७ कोटी ५० लाख रुपये अनुदान खर्च करून जवळपास ७० हजार क्विंटल बियाणे वाटण्यास सुरवात केल्याची माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक डॉ. एस. एल. जाधव यांनी दिली.

शेतकऱ्यांना जॅकी ९२१८ आणि आकाश या वाणाचे अनुदानित बियाणे पुरवठ्याची जबाबदारी महाबीजवर सोपविण्यात आली आहे. काही प्रमाणात राष्ट्रीय बीज महामंडळाकडून देखील बियाणे दिले जात आहे. शेतकऱ्यांना प्रतिकिलो २५ रुपये अनुदान दिले जात असून महाबीजच्या विक्रेत्यांकडून अनुदानित बियाण्यांची विक्री सुरू आहे.

हरभरा उत्पादन वाढीसाठी यंदाची अनुकूल स्थिती लक्षात घेत १०५० शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांचे पेरणीयंत्र वाटले जात आहे. याशिवाय १३०० शेतकऱ्यांना एक कोटी ३० लाख रुपये खर्च करून पंपसंचासाठी अनुदान वाटले जाईल. पेरणीयंत्र व पंपसंचासाठी राज्यात शेतकऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली आहे.

शेतकऱ्यांना हरभरा उत्पादन वाढीसाठी ३ लाख मीटर पाईप वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. लातूर जिल्ह्यात ३३ हजार मीटर तर उस्मानाबाद २२५०० मीटर, नांदेड १८००० मीटर तर यवतमाळमध्ये २३४०० मीटर पाईप वाटले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेनंतर हरभरा लागवड केल्यास फुले येण्याच्या टप्प्यात चांगले पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

बाजार टिकून असल्यामुळे पेरा वाढणार
खरिपात तुरीने फजिती केली. मात्र हरभऱ्याचे बाजार टिकून असल्यामुळेच शेतकऱ्यांचा कल यंदाही हरभरा लागवडीकडे आहे. याशिवाय भारतातून हरभरा निर्यात सुरू करता येते का; तसेच विदेशी हरभरा आणि पिवळा वाटाणा आयात कशी रोखता येईल यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक बदलासाठी हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास हरभरा बाजारपेठेची स्थिती मजबूत राहू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक...सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या...
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
करडई पीक सल्लागेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...