जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून हजेरी

जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून हजेरी
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून हजेरी

जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा सोडणे, रजा न टाकताच दांडी मारणारे अनेक शिक्षक आहेत. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ''व्हॉटस्‌ॲप'' हजेरीची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, यावरून शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांची बाजू काही सदस्य आगामी सर्वसाधारण सभेत मांडून या विषयावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्‍यता आहे.  

वर्षभरापूर्वी ही प्रणाली बंद पडली होती. पण ती काही सुधारणा करून पुन्हा सुरू केली असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांना दोन्ही वेळेस हजेरीचे अपडेट्‌स या प्रणालीद्वारे द्यावे लागत आहेत. अनेक शिक्षक आम्हाला इंटरनेटचा खर्च हवा, आमच्याकडे स्मार्ट फोन नाही, दुर्गम भागात नेट कनेक्‍टिव्‍हिटी नाही, महिलांना या प्रणालीतून आपली छायाचित्रे काढून पाठविण्याची सक्ती कशी करता, असे मुद्दे उपस्थित करीत आहेत. ही प्रणाली सोमवारपासून (ता. ११) सुरू झाली आहे.

 मुख्यालयात सूचना केंद्र प्रमुख यासंदर्भात काम पाहत आहेत. तालुका स्तरावर विस्तार अधिकारी यांच्याकडे प्रमुख जबाबदारी आहे. केंद्रप्रमुखांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले आहेत. त्यावर स्वाक्षरी केलेल्या मस्टरचे छायाचित्र सकाळी आणि सायंकाळी टाकावे लागत आहे. याशिवाय केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांनादेखील रोजचे हजेरी मस्टर आणि शाळा भेटींचे छायाचित्र टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक परिषद, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, शिक्षक संघटना आदींकडून यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

काही संघटनांच्या प्रतिनिधींनी सदस्यांशी चर्चा केली. सत्ताधारी व विरोधक याप्रश्‍नी प्रशासनातील वरिष्ठांची समजूत घालून ही हजेरी प्रणाली कशी अयोग्य आहे, हे पटवून देण्याची तयारी करीत आहेत. 

शिक्षकांकडून विरोध अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नसून, शहर किंवा तालुक्‍याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. यामुळे शाळेत वेळेवर न येणे तसेच शाळेतून लवकर जाण्याचे प्रकार रोजचे असतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी ''व्हॉटस्‌ॲप'' हजेरी ही प्रणाली सुरू केली होती. यास शिक्षकांकडून विरोध झाला. काही शिक्षक न्यायालयात गेले. मात्र, याबाबतचा निकाल जिल्हा परिषद प्रशासनाकडून लागला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com